मुंबई -एल्गार परिषद शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक झालेल्या दिल्ली विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर हनी बाबू यांना अद्याप रुग्णालयातून सोडण्यात येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करीत ब्रीच कँडी रुग्णालयाला सांगितले की, हनी बाबू यांना एक जूनपर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू नये. तसेच, रुग्णालयाने त्याच्या तब्येतीवर आणि त्याच्यावरील उपचारांविषयी वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. खंडपीठाने म्हटले आहे की, खासगी रुग्णालय एक जूनपूर्वी हनी बाबूची सुटका करणार असेल तर त्यांनी कोर्टाला कळवावे व त्यांची परवानगी घ्यावी लागेल. बाबू यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बाबू यांच्या डाव्या डोळ्याला संसर्ग झाला असून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आले नाहीत तर त्यांची दृष्टी जाण्याची भीती आहे.
एल्गार परिषद प्रकरण : अटकेतील आरोपी हनी बाबू यांना रुग्णालयातून डिस्चार्ज न देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
एल्गार परिषद शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक झालेल्या दिल्ली विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर हनी बाबू यांना अद्याप रुग्णालयातून सोडण्यात येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करीत ब्रीच कँडी रुग्णालयाला सांगितले की, हनी बाबू यांना एक जूनपर्यंत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू नये. तसेच, रुग्णालयाने त्याच्या तब्येतीवर आणि त्याच्यावरील उपचारांविषयी वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बाबूला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून आणून सरकारी जे.जे. रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना मुंबईतील जीटी रुग्णालयात नेण्यात आले. बाबूचा अंतरिम जामीन आणि वैद्यकीय मदतीसाठी त्यांची पत्नी जेनी रोवेना यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हनी बाबू यांचे वकील युग चौधरी यांनी युक्तिवाद केला की, बाबूच्या डोळ्यात गंभीर संक्रमण आहे. 1 मे रोजी कोर्टाने बाबूला स्वत:च्या खर्चाने दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली. वकील युग चौधरी यांनी या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली आणि म्हणाले की, बाबूला रुग्णालयातून डिस्चार्ज करुन तुरूंगात पाठवू नये. चौधरी म्हणाले, 3 ते 12 मे दरम्यान डोळ्याच्या संसर्गाच्या तक्रारीकडे तुरूंगातील अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही.
ते म्हणाले की, सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमची एकच विनंती आहे की त्यांना उपचारांची आवश्यकता नसल्याच्या कारणावरून रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर त्यांना तुरूंगात पाठवू नये. बाबूच्या डोळ्यातील संसर्ग हा एक नवीन रोग म्हणजे काळी बुरशी आहे काय, असे कोर्टाने विचारले असता चौधरी म्हणाले की, त्याची रुग्णालयात तपासणी केली गेली आहे. परंतु ते बुरशीजन्य संसर्ग किंवा जीवाणूजन्य संसर्ग आहे की नाही, ते माहीत नाही.
हॉस्पिटलने हनी बाबूचा आरोग्य अहवाल सादर केला. खंडपीठाने सांगितले की, बाबूच्या तब्येतीबाबत आणि त्यांच्यावर कोर्टाला काय उपचार देण्यात आले याबाबत रुग्णालयाने अहवाल सादर करावा. न्यायमूर्ती शिंदे म्हणाले, म्यूकर मायकोसिस हे एक गंभीर संक्रमण आहे. जी एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते. ते खूप धोकादायक आहे. आम्हाला ते माहित असणे आवश्यक आहे, की ते योग्य उपचार घेत आहेत की नाही. पीएमसी आणि सरकारी रुग्णालयात कोविडोत्तर काळ्या बुरशीच्या आजाराच्या उपचारासाठी इंजेक्शन्स उपलब्ध असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. खंडपीठ आता या प्रकरणी 1 जून रोजी सुनावणी घेणार आहे. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेच्या बैठकीत एनआयएने हनी बाबू यांना जुलै 2020 मध्ये अटक केली होती.