महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#coronavirus : लॉकडाऊन दरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी घ्यावी लागतेय प्रचंड मेहनत - वीज कर्मचारी

मुंबई शहरात अनेक ठिकाणी बंद असलेल्या इमारती, हॉल यामध्ये क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहेत. इथे अवघ्या काही तासात विजेची व्यवस्था करणे, नवे मीटर लावणे, मुख्यतः हॉस्पिटलमधील वीज खंडित होऊ नये, यासाठी वीज कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

lockdown effect on electricity workers
लॉकडाऊन दरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना घ्यावी लागतेय मेहनत

By

Published : Apr 14, 2020, 12:28 PM IST

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर, पालिका प्रशासन, पोलीस यांच्याप्रमाणेच इतरही यंत्रणा दिवसरात्र मेहनत करत आहेत. मुंबई, ठाणेसह महाराष्ट्राच्या विविध भागात महावितरणतर्फे वीज पुरवठा केला जातो. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात वीज कर्मचारी दिवस रात्र कर्तव्यावर आहेत. त्यामुळेच आपल्याला वीज पुरवठा सुरळीतपणे सुरु आहे.

लॉकडाऊन दरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना घ्यावी लागतेय मेहनत...

हेही वाचा...राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई शहरात अनेक ठिकाणी बंद असलेल्या इमारती, हॉल यामध्ये क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले आहेत. इथे अवघ्या काही तासात विजेची व्यवस्था करणे, नवे मीटर लावणे, मुख्यतः हॉस्पिटलमधील वीज खंडित होऊ नये, म्हणून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. घरीच असलेल्या आणि अनेक विद्युत उपकरणांचा लाभ घेत असलेल्या नागरिकांना देखील अखंड विद्युत पुरवठा करणे, यासाठी हे सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत.

'कोरोना आणि या लॉकडाऊनच्या काळात आमचे कर्मचारी देखील अति आवश्यक सेवा देत आहेत. त्यांना आम्ही ग्लोव्हज देखील पुरवले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगितले आहे. विलीगरण कक्षासाठी मीटर बसवण्याचे काम आम्ही करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेत आहोत' असे भांडुप महावितरणच्या कार्यलयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details