महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विधान परिषदेच्या 8 जागांसाठी डिसेंबर अखेर निवडणूक होण्याची शक्यता!

विधान परिषदेमधील आठ आमदारांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 मध्ये संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये आठ नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

file photo
फाईल फोटो

By

Published : Oct 26, 2021, 9:58 PM IST

मुंबई - विधान परिषदेमधील आठ आमदारांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 मध्ये संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये आठ नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे रामदास कदम आणि गोपीकिशन बजोरिया, काँग्रेसचे भाई जगताप आणि सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप, भाजपचे अमरिश पटेल आणि गिरीष व्यास तर, अपक्ष प्रशांत परिचारक यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या आठ जागांवर संधी मिळावी यासाठी चारही पक्षाकडून लॉबिंग सुरू झाली आहे.

राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर 8 जागेसाठी होणारी निवडणूक देखील लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. या सोबतच कार्यकाळ संपत असणाऱ्या आमदारांना त्यांचा पक्ष पुन्हा एकदा संधी देईल का? यासाठी देखील आमदार प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

  • राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अद्याप प्रलंबित -

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. राज्य सरकारकडून राज्यपालांना सुचवण्यात आलेल्या नावांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. विधान परिषदेवरील आठ आमदारांचा कार्यकाळ संपल्याने एक जानेवारीपासून वीस आमदारांची जागा रिकामी राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -आमदार नियुक्ती प्रलंबित ठेवण्यामागे राज्यपालांवर राजकीय दबाव असेल -संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details