महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MH Assembly Winter Session 2021 : अध्यक्षांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात? वाचा, आज विधानसभेत काय घडले? - Latest News Winter Session Maharashtra

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत ( Maharashtra Assembly Winter Session 2021 ) घेण्यात आले होते. पाच दिवसांचे हे अधिवेशन चांगलेच वादळी राहिले. आमदार नितेश राणेंनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Nitest Rane Cat Voice On Aditya Thackeray ) यांची उडवण्यात आलेली खिल्ली, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ( Assembly Speaker Election ) , निलंबित 12 आमदारांचा (Suspend MLA ) मुद्दा, तसेच अधिवेशनाचा कालावधी वाढवणे यासह विविध मुद्यांनी हे अधिवेशन गाजले.

Maharashtra Assembly Winter Session 2021
Maharashtra Assembly Winter Session 2021

By

Published : Dec 28, 2021, 5:55 PM IST

मुंबई -विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत घेण्यात आले होते. पाच दिवसांचे हे अधिवेशन हे चांगलेच वादळी राहिले. आमदार नितेश राणेंनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Nitest Rane Cat Voice On Aditya Thackeray ) यांची उडवण्यात आलेली खिल्ली, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, निलंबित 12 आमदारांचा मुद्दा, तसेच अधिवेशनाचा कालावधी वाढवणे यासह विविध मुद्यांनी हे अधिवेशन गाजले. तर आज अध्यक्षपदाची निवडणूक, आमदारांच्या गैरवर्तवनावर अजित पवारांची फटकेबाजी, सहकार बिलांवरून विरोधकांचा सभात्याग यासह विविध मुद्यांनी गाजला. तसेच आज अखेरच्या दिवशी सरकारतर्फे अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली.

अध्यक्षांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात?

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. याबाबत मंत्रिमंडळ बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांची निवडणूक घेण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठण्यात आला. मात्र, त्यावर राज्यपालांची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक घेता आली नाही. त्यामुळे ही निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

कुत्र्या, मांजरांना प्रतिनिधित्व करत नाही- अजित पवार

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर अजित पवारांनी आमदारांच्या वर्तवणुकीसंदर्भात एक प्रस्ताव सभागृहापुढे मांडला. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'आमदारांनी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख व्हावे. सभ्याचार, शिष्टाचार, आदर्श आचारसंहितेचे पालन करून राज्यासमोर आदर्श ठेवावा, राज्याच्या विधानसभेत नेहमीच नैतिकता ( Morality in MH assembly ) जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यासमोर शिष्टाचार आणि आदर्श आचारसंहितेचे पालन नेहमीच करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कित्येकदा काही सदस्यांकडून गैरवर्तन ( Bad behavioral of MLA in Assembly ) होऊन सभागृहाच्या प्रतिमेला तडा जातो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यापुढे सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही, असे वर्तन सर्व सदस्यांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar to MLA for behavioral ) यांनी आज विधानसभेत केले.

आपण राज्यातील लाखो मतदारांचे प्रतिनिधित्व या सभागृहात आमदार म्हणून करीत असतो. आपण कुत्रा किंवा मांजर यांचे प्रतिनिधित्व येथे करत नाही. त्यामुळे प्राण्यांचे आवाज काढून आपले गैरवर्तन दाखवू नका, असे खडे बोल उपमुख्यमंत्री पवार यांनी सभागृहात ( Ajit Pawar Slammed MLAs for behavioral ) काढले. तसेच सर्व आमदारांनी आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करावा. सभागृहात सभागृहाच्या प्रांगणात शिष्टाचार आणि सभ्यतेला धरून वर्तन करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

सभागृहाचा दर्जा कायम ठेवा - देवेंद्र फडणवीस

अजित पवार यांनी केलेल्या निवेदनाला समर्थन देत सभागृहाचा दर्जा कायम ठेवावा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले. तसेच सदस्यांना देण्यात आलेल्या पुस्तिकेमध्ये आणखी काही वर्तनाचे नियम जोडून नव्याने सदस्यांना पुस्तिका देण्यात याव्यात, अशी पुस्तीही विरोधी पक्षनेते फडणवीस ( Devendra Fadnavis on MLAs behavioral ) यांनी केली. जेणेकरून सभागृहाबाहेरही कसे वर्तन करावे याचे त्यांना आकलन होईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

आपण सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक - मुंगटीवार

सभागृहात आपण सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, आपण स्वत:च्या चुकीचे वकील आणि दुसऱ्यांच्या चुकीचे न्यायाधीश बनू नये, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार सुधीर मुंगटीवार यांनी दिली. तसेच अधिकारी आम्हाला उत्तर देत नाही, त्यांच्यासाठीही आचारसंहिता तयार करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.

हेही वाचा -Bhima Koregaon Commission : भीमा कोरेगाव आयोगाला राज्य सरकारकडून सहा महिन्यांची मुदत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details