मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी शिवसेनेचे ४०आमदार आणि १२ खासदार फोडून स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या अगोदरच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकनाथ शिंदेच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेली कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी निवडण्याची माहिती ही ( Election commission India ) आयोगाला देण्यात आली आहे.
पूर्ण शिवसेनाच काबीज करण्याचा प्रयत्न?महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे व फडवणीस ( Eknath Shinde government ) सरकार स्थापन झाले. परंतु हे सरकार स्थापन करत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडून एक स्वतंत्र गट स्थापन केला. पण अखेर शेवटी शिवसेना कुणाची? हा प्रश्न उपस्थित झाला असून या प्रश्नावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र सुनावणीच्या आधीच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे यांचे पत्र आयोगाला देण्यात आले असून आता संपूर्ण शिवसेना काबीज करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होताना दिसत आहे.
आता आर-पारची शेवटची लढाई?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार फोडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. परंतु ही सुनावणी होण्याअगोदरच शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन शिंदे यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी निवडण्याची माहिती या पत्रामध्ये आयोगाला देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जर मान्यता दिली, तर शिवसेना ही शिंदेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आता पक्ष ताब्यात घेण्यासाठी शेवटची लढाई सुरू केली आहे.
शिंदे यांचे मिशन दिल्ली यशस्वी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मिशन दिल्ली यशस्वी केले आहे. शिवसेनेचे १२ खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाऊन भेटले व त्यांनी त्यांच्या सहमतीच पत्र त्यांना दिलं. या पत्रात खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत गटनेता म्हणून तर खासदार भावना गवळी यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. ही मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली असून, लोकसभेत आता शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे तर प्रतोद पदी भावना गवळी यांची निवड झाली आहे.