महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' पत्राला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ - दीपक केसरकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना शिवसेना नेते पदावरून हटवले आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यानी शिंदे यांना दिला आहे. मात्र, हे पत्र त्यांनी मागे न घेतल्यास आम्ही त्यांना कायदेशीर पद्धतीनेच उत्तर देऊ असे वक्तव्य शिवसेना बंडखोर आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी केला आहे

Eknath Shinde: We will give a legal reply to Uddhav Thackeray's letter - Deepak Kesarkar
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' पत्राला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ - दीपक केसरकर

By

Published : Jul 2, 2022, 4:21 PM IST

मुंबई -शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पदावरून हटविण्यासंबंधीचे दिलेले पत्र मागे न घेतल्यास आम्हीही त्याला कायदेशीर उत्तर देऊ असे दिपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी म्हटले आहे. गरज पडल्यास योग्य ते पाऊल उचलू असे वक्तव्य त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. शिंदे गटाचे पक्षप्रवक्ते केसरकर यांनी आज गोव्यात पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेलाच ( Shiv Sena ) इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृह नेते तसेच विधिमंडळाचे नेते आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री ( Chief Minister Eknath Shinde ) असून त्यांना शिवसेना पक्षातील बंडखोर आमदारांसोबत अनेक आमदारांचाही पाठिंबा आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इतर पक्षांनीही त्यांना सन्मान द्यावा. त्यांच्यावर जर कारवाई झाली तर त्याला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा केसरकर यांनी दिला आहे.

Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंच्या 'त्या' पत्राला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ - दीपक केसरकर

खातेवाटप विषयी सविस्तर चर्चा - राज्यात बंडखोर नेते एकनाथ शिंदे व भाजप यांचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता खाते वाटपावरून चर्चा रंगू लागलेल्या आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्रीपद त्याच बरोबर भाजपला किती मंत्रीपद देण्यात यावीत याबाबत शुक्रवारी (दि. 1 जुलै) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या अग्रदूत या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी भेट देऊन याविषयी सविस्तर चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे.

मंत्रिमंडळाचे गठन लवकरच -मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाचे गठन लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत दोन्ही बाजूंच्या आमदारांना मंत्रीपद दिली जाणार आहेत. परंतु ही मंत्रीपद देत असताना खाते वाटपाबाबत मात्र अजूनही घोळ सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जवळपास दीड तास या विषयावर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण भाजपला नाही तर राजकीय वर्तुळात मोठा धक्का खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देत मुख्यमंत्री म्हणून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन होत असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्री पद व कुठली खाती दिली जातात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर अपक्ष व समर्थक असलेल्या आमदारांना सुद्धा दोन्ही बाजूंकडून मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2019 मध्ये शिवसेनेकडे ही कॅबिनेट खाती -महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा, नगर विकास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, माजी सैनिक कल्याण, वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता रोजगार हमी, फलोत्पादन, परिवहन, संसदीय कार्य, जलसंधारण, पर्यटन, पर्यावरण राज्य शिष्टाचार ही कॅबिनेट खाती होती.

हेही वाचा -मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details