मुंबई इंग्रजी ऐवजी मराठीत 10 वी पर्यंत शिकल्याने मुंबई महापालिकेने 252 पात्र उमेदवारांना नोकरी नाकारली होती. बेरोजगार असलेल्या मराठी पात्र शिक्षकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट Eknath Shinde order to BMC commissioner घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्वरित मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबालसिंग चहल फोनवर संभाषण करीत तातडीने या समस्यांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
राज्य सरकारने 2017 मध्ये पवित्र पोर्टल नावाने ऑनलाईन शिक्षकांच्या भरतीसाठी पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर अभियोग्यता चाचणी जे उत्तीर्ण होतात त्यांची उमेदवार म्हणून निवड केली जाते. पात्र उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलने विविध जिल्हा परिषद आणि महानगरपालिका problems of Marathi teachers यांना कळविली.
252 उमेदवार नोकरीपासून वंचित2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेने सरकारच्या पवित्र पोर्टल Pavitra Potral issue शिफारशीवरून शिक्षकांच्या भरतीसाठी मे 2019 मध्ये जाहिरात दिली. या जाहिरातीनुसार शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवार व्यक्तींनी महापालिकेकडे अर्ज केले. त्यांनी कागदपत्रेदेखील जमा केले. मात्र कागदपत्रे पूर्तता करूनही 252 उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे, माहिती शिक्षक अझरुद्दीन पटेल कोल्हापूर यांनी ईटीव्ही भारतला दिली.