मुंबई :महाराष्ट्रातील वाढत्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना विधीमंडळ पक्षाने 34 आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेला एक ठराव पारित केला आहे, ज्यामध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे हेच नेते ( Eknath Shinde continues to be legislative party chief ) आहेत. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हा ठराव पाठविण्यात आला ( rebel MLAs write to Maharashtra Governor ) आहे.
मंगळवारी मंजूर करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांची २०१९ मध्ये शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती आणि ते यापुढेही विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यात भरत गोगावले यांची पक्षाचे मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय संकटानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली होती. मात्र, या ठरावाला बंडखोरांनी पलटवार केला आहे.