मुंबई -एकनाथ शिंदेयांच्या मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी ( Eknath shinde cabinet ) शपथ घेतली. या मंत्रिमंडळात सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्च शिक्षित असून त्यांनी कोलंबो विद्यापीठातून ( University of Colombo ) डॉक्टरेट पदवी घेतली आहे. तर, एक मंत्री केवळ दहावी पास आहे. एकनाथ शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तार मध्ये 9 मंत्री एकनाथ शिंदे गटातले तर, इतर नऊ मंत्री भारतीय जनता पक्षातल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या मंत्रीमंडळात सामावून घेतलेल्या 18 मंत्र्यांपैकी किती मंत्री उच्चशिक्षित आहेत? किती मंत्री दहावी पास आहे? त्याबाबत आढावा या रिपोर्टमध्ये आपण घेणार आहोत. नव्या मंत्रिमंडळात मंत्री सुरेश खाडे ( Suresh Khade ) हे सर्वात जास्त उच्चशिक्षित आहेत. तर एका मंत्र्यांचे फक्त दहावी प्रर्यंत शिक्षण झाले आहे. ( Eknath Shinde Cabinet Ministers Education )
राधाकृष्ण विखे पाटील -राधाकृष्ण विखे पाटीलयांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. अहमदनगरच्या प्रवरा नगर येथून प्रवरा युवक काँग्रेसची स्थापना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकीय घरण्याची पार्श्वभूमी लाभली आहे. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना विखे पाटील यांच्या कुटुंबीयांनी सुरू केला होता. 1995 पासून ते सलग आज पर्यंत शिर्डी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत.
चंद्रकांत पाटील-यांचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झाले आहे. चंद्रकांत पाटील यांचे शिक्षण मुंबईत पूर्ण झाले असून मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी बीकॉमची पदवी घेतली आहे. मात्र, आपल्या राजकीय कारकीर्द त्यांनी कोल्हापुरातून सुरू केली. 1980 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी सुरू केले होते. तर, युती सरकारमध्ये सहकार, महसूल सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत.
गिरीश महाजन-यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख राजकीय वर्तुळात आहे. अनेक वेळा पक्षासाठी त्यांनी "संकटमोचक" म्हणून भूमिकाही बजावली. 2014 च्या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा हे महत्त्वाचं खातं मंत्री म्हणून सांभाळे.
सुधीर मुनगंटीवार -यांचे शिक्षण पदव्युत्तरपर्यंत झाले आहे. 1995 पासून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून सलग आतापर्यंत ते निवडून आले आहेत. 1981 पासून विद्यार्थी संघटनेतून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. 1999 सली असलेले युतीच्या सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
गुलाबराव पाटील-यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. गुलाबराव पाटील यांचा राजकीय प्रवास हा त्यांच्या संघर्षमय राहिला. सुरवातीच्या काळात ते पानटपरी चालवायचे. त्यानंतर शिवसेनेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला. 1992 साली पहिल्यांदा ते पंचायत समिती सदस्य झाले. 1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.
उदय सामंत- ऑटोमोबाइल क्षेत्रातील डिप्लोमा केला आहे. 2004 सालापासून आतापर्यंत ते सलग रत्नागिरी मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. आधी राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. 1999 सालापासून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले.
दादा भुसे-यांचे सिविल इंजीनियरिंग पर्यंतचे शिक्षण झाले आहे. दादा भुसे सुरुवातीला पाटबंधारे विभागामध्ये अभियंता म्हणून काम करत होते. या विभागात त्यांनी पंधरा वर्षे नोकरी केली. त्यानंतर आनंद दिघे यांच्या ते संपर्कात आले. 2004 साली पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक मालेगाव मतदार संघातून लढवली.
दीपक केसरकर- त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून दीपक केसरकर यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. सुरुवातीला काँग्रेस पक्षा सोबत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केल.1992 ला ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. मात्र, 2009 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली.
अब्दुल सत्तार-पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1984 साली अब्दुल सत्तार पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. 1994 साली ते पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. 2009 साली ते काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2019 च्या विधानसभा निवडणूक आधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळीही ते निवडून आले होते.