महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागरिकांना ५०० फुटाचे घर देणे हाच काँग्रेसचा मुद्दा - एकनाथ गायकवाड - Bjp

सरकारला साडेचार वर्ष पूर्ण झाले, तरी मुंबईतील समस्या कायम आहेत. गरिबांना ना घर आहे, ना रस्ता आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना ५०० फुटाचे घर देणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

एकनाथ गायकवाड

By

Published : Mar 25, 2019, 9:06 AM IST

मुंबई - भाजप आणि शिवसेनेने खोटी आश्वासने देऊन विकासाचे एकही काम केले नसल्याचा आरोप एकनाथ गायकवाड यांनी केला. आगामी निवडणुकीत दक्षिण-मध्य मुंबईतील नागरिकांना घर देणे हाच काँग्रेसचा मुद्दा असणार आहे, अशी माहितीही गायकवाड यांनी दिली. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

एकनाथ गायकवाड

यावेळी बोलताना ते म्हणाले, की आज साडेचार वर्ष पूर्ण झाले, तरी मुंबईतील समस्या कायम आहेत. गरिबांना ना घर आहे, ना रस्ता. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिकेसी येथील जाहीर सभेत, आम्ही प्रथम मुंबईतील नागरिकांना ५०० फुटांचे घर देणार असल्याची घोषणा केल्याचेही ते म्हणाले.


दक्षिण-मध्य मुंबईतील प्रकल्प, बेरोजगारी, जीएसटी, नोटाबंदी, छोट्या व्यवसाय कशा प्रकारे अडचणीत आले त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही त्यांनी आरोप केला. रोजगार देण्याऐवजी सरकारने रोजगारच संपवले आहेत. देशात आता मी चौकीदार आहे, असे सगळेच भाजपचे नेते बोलतात. मात्र प्रथम तुम्ही भारतीय आहात, असे बोला असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या काळात लोकपाल मंजूर केले होते, पण त्यांची नियुक्ती करण्यासाठी आज साडेचार वर्ष वाट पाहावी लागली आहे .आता मोदींची उलट गिनती चालू झाली त्यानंतर लोकपाल नियुक्ती केल्याचेही ते म्हणाले. सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरु झाले का असा सवालही त्यांनी केला.


लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी भाजपकडे उमेदवारच नाहीत. आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींची मुले पळवून त्यांना उमेदवारी देतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मी राजकारण भरपूर केले, मी आता जनतेसाठी काम करणार आहे. जनतेच्या पाठिंब्यानेच मनोहर जोशी यांचा पराभव केल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

ABOUT THE AUTHOR

...view details