मुंबईवेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या Vedanta Foxconn Project संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. यावरून आता विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारला सुरू केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रकल्प बाबत लक्ष न दिल्यामुळेच एवढी मोठी गुंतवणूक शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये गेले असल्याचा आरोप केला आहे.
Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्र्याची सभागृहात माहिती देऊनही वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला? विरोधकांकडून टीकेचा भडिमार सुरू - व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर
Vedanta Foxconn Project वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. यावरून आता विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारला सुरू केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रकल्प बाबत लक्ष न दिल्यामुळेच एवढी मोठी गुंतवणूक शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये गेले असल्याचा आरोप केला आहे.
राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असतानाच गेल्या वर्ष- दीड वर्ष या कंपनीसोबत पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र तात्कालीन सरकारने योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळेच हा महत्त्वाचा प्रकल्प गुजरात राज्यात गेला असल्याचा स्पष्टीकरण राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. मात्र त्यानंतरही नुकतच झालेलं पावसाळी अधिवेशन दरम्यान विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांत ग्रुप सोबत राज्य सरकारची चर्चा सुरू असून राज्यांमध्ये जवळपास चार लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचं सांगितलं होतं. वेदांतावाला आलाय, चार लाख कोटीची गुंतवणूक करतोय राज्यामध्ये उद्योगासाठी पोषक वातावरण असलं पाहिजे, असे वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलं होतं. मात्र एवढ्या आत्मविश्वासाने केलेल्या वक्तव्यानंतरही संबंधित कंपनी राज्यातून बाहेर का गेली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दोन लाख कोटीच्या प्रकल्पाला चार लाख कोटींचा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांत ग्रुप सोबत महाराष्ट्र सरकार करार करते आणि यासाठी चार लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातील केली जाईल हे वक्तव्य करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होतो. यावरच मुख्यमंत्र्यांना चिमटा काढत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री दोन लाख कोटीच्या प्रकल्पाला चार लाख कोटीचा प्रकल्प म्हणत आहेत. मुख्यमंत्री केवळ मंडळ फिरत आहेत गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहेत त्यांना उद्योग क्षेत्रात लक्ष घालायला वेळ नाही असा टोलाही मारला आहे.