मुंबई- आम्ही देशातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आहे. त्यामुळेच नागरिकांनी आम्हाला भरभरून मते दिली. राज्यातही सरकारचे काम चांगले असल्याने आम्हाला यश मिळाल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत दिली. मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघात भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी गोरेगाव येथील नेल्को येथे मतदान केंद्रासमोर येऊन माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
मोदी विकास करतात, मोदी सुरक्षेच्या विषयी चांगले निर्णय घेतात. जगामध्ये भारताचे नाव उज्वल करतात, गरिबांना घर देतात. त्यामुळे देशातील मतदारांनी हे उत्तर दिले आहे. जे मोदींचा विरोध करत होते, त्यांनाही चपराक आहे. ज्या मोदींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन नेत्यांनी केले होते, त्या कलाकारांना मी सांगतो, की काँग्रेसच्या काळात विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.