महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले ! - विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी घेण्यासाठीचा अट्टहास

विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत घेण्यासाठीचा अट्टहास करणाऱ्या कुलगुरू सुहास पेडणेकर यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चांगलेच झापले. यासाठी यापुढे पुन्हा वाद निर्माण होईल असे कोणतेही निर्णय घेऊ नये असे निर्देशही मंत्री सामंत यांनी कुलगुरुंना दिले.

Education minister angry on Vice Chancellor
उच्च शिक्षण मंत्र्यांनी कुलगुरूला झापले

By

Published : Feb 4, 2020, 11:18 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत घेण्यासाठीचा अट्टहास करणाऱ्या कुलगुरू सुहास पेडणेकर यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चांगलेच झापले. विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हे यापुढे यशदा किंवा प्राध्यापकांसाठी असलेल्या संस्थांमध्ये घेण्यात यावे, आणि यासाठी यापुढे पुन्हा वाद निर्माण होईल असे कोणतेही निर्णय घेऊ नये असे निर्देशही मंत्री सामंत यांनी कुलगुरूंना दिले.

उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले

विधानभवनात विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हे निर्देश दिले.

भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मुंबई विद्यापीठातील ३० वरीष्ठ अधिकाऱ्यांचे ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी असे दोन दिवसांसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. पहिल्या दिवसाच्या प्रशिक्षणाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव सातव यांनी यावर आक्षेप घेतला होता. संघाच्या संबंधित असलेल्या संस्थेत अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असेल तर त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ दखल घेऊन ते रोखावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे लगेचच मंत्री सामंत यांनी दिलेल्या आदेशानंतर १ फेब्रुवारीला दुपारी हे प्रशिक्षण रोखण्यात आले होते. त्यासंदर्भात सर्व खुलासा घेण्यासाठी सामंत यांनी विधानभवनात एक बैठक घेऊन कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांना चांगलेच झापले असल्याचे एका वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details