मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना ईडीने आज चौकशीकरिता बोलावले आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकार्यांमार्फत झालेल्या हवाला प्रकरणात ईडीकडून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
ईडी कार्यालयात दाखल करण्यात आले
प्रकृतीच्या कारणावरून नवाब मलिक जेजे रुग्णालयात दाखल आहेत. (ED Summons Malik Son Today) मागील शुक्रवारी नवाब मलिक यांना पोट दुखण्याच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आज त्यांना जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, त्यांना ईडी कार्यालयात दाखल करण्यात आले आहे.
पोटात दुखू लागल्यामुळे जेजेमध्येच ठेवण्याचा सल्ला
दाऊद इब्राहिमच्या बहिणीला कुर्ला येथे मालमत्ता बळकावण्यासाठी मदत करणे आणि नंतर ती खरेदी करणे या आरोपाखाली मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. यातील पैसा हवालामार्फत टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे. मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश पीएमएलए कोर्टाने दिले होते. शुक्रवारी मलिक यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे जेजेमध्येच ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.