महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Charge Sheet Filed Against Pravin Raut : प्रवीण राऊत यांच्याविरोधात ईडीने केले दोषारोपत्र दाखल - पत्राचाळ घोटाळा प्रकरण

गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ( ईडी ) ने प्रवीण राऊत यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले ( Charge Sheet Filed Against Pravin Raut ) आहे. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांचे निकटवर्तीय मानले जातात.

प्रवीण राऊत
प्रवीण राऊत

By

Published : Apr 1, 2022, 4:47 PM IST

मुंबई : ईडीने प्रवीण राऊत यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केलं ( Charge Sheet Filed Against Pravin Raut ) आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. ईडीने प्रवीण राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्यात अटक केली होती. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. जे 10 वर्षानंतर परत करण्यात आले असं समोर आलं होतं. प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरीही छापा टाकला होता आणि पाटकर यांची चौकशीही केली होती.

कोण आहेत प्रवीण राऊत? : प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेल्या वाधवान कुटुंबियांशीसुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्याचे 90 कोटी रुपये हडपले, असा संशय ईडीला आहे. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होता. या व्यवहारामुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details