महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ; आर्थिक पाहणी अहवालातील माहिती

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालानुसार वर्ष 2018 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 35 हजार 497 घटना घडल्या होत्या. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 37 हजार 567 पर्यंत पोहोचले आहे.

File photo
संग्रहित

By

Published : Mar 5, 2020, 6:01 PM IST

मुंबई- राज्यातील महिला सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालानुसार वर्ष 2018 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या 35 हजार 497 घटना घडल्या होत्या. तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 37 हजार 567 पर्यंत पोहोचले आहे.

हेही वाचा -थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; हे राज्य अग्रसेर

वर्ष 2018 मध्ये बलात्काराचे 4 हजार 974 गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यात वाढ होऊन 2019 मध्ये 5 हजार 412 पर्यंत गुन्ह्यांचे प्रमाण झाले आहे. महिलांचे अपहरण आणि पळवून नेणे यात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष 2017 मध्ये 6 हजार 248 गुन्ह्यांची नोंद झाली. ती वाढून 2019 मध्ये 8 हजार 382 झाली आहे.

हेही वाचा -महा'अर्थ': सर्वाधिक जीडीपी असलेल्या महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक

हुंडाबळी अल्प प्रमाण कमी झाले आहे. 2018 मध्ये हुंडाबळीच्या गुन्ह्यांची 200 आणि 2019 मध्ये 187 नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details