मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वरळीतील श्री आर्ट गणेश कार्यशाळेने गार्डनच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपती साकारला आहे. यासोबतच मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक खताने भरलेले भांडे देण्यात येत आहे, त्यामुळे या 'वृक्ष गणेशा' संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच लोकांना घरच्या घरीच गणपती मूर्तीचे विसर्जन करता यावे, यादृष्टिकोणातून 'वृक्ष गणेशा' ही संकल्पना राबवल्याचे 'श्री आर्ट गणेश'चे किरण देवरे यांनी सांगितले. पर्यावरणपूरक गणेशा बरोबरच खताने भरलेले भांडे ग्राहकाना देण्यात येते, या खताच्या भांड्यात नंतर गणपती मूर्ती विसर्जित करून त्यात बीज पेरून वृक्ष लागवडीचा आनंद देखील ग्राहकांना घेता येणार आहे.