मुंबई : राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात सुरू असलेले केंद्रीय तपास यंत्रणेचे ससेमिरे काही साथ थांबलेला दिसत आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत होती. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या अनेक नेत्यांनी आता शिंदे गटात सामील झाल्याने शिंदे गट आणि राज्यातील भाजप पक्षाने राज्यात सत्ता स्थापन केल्यामुळे या गटातील अनेक आमदार खासदार आणि नेत्यांविरोधातील कारवाया थंड्या बसतात पडल्या आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना वारंवार आरोप : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक नेते आमदार-खासदार यांच्या विरोधात दर चार दिवसांनी चौकशीकरिता कारवाई, छापेमारी असे प्रकार गेल्या दोन वर्षांत अनेकदा समोर आले आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, माजी परिवहन मंत्री अनिल परब, खा. संजय राऊत यांच्यासह अनेक नेते आणि आमदारांवर ईडीकडून चौकशी करण्यात येत होती.
भाजप नेते किरीट सोमय्या करीत होते वारंवार आरोप : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तर या सर्वांना जेलमध्ये जावे लागेल अशाप्रकारे वक्तव्यदेखील केले होते. मात्र, आता सोमिया यांचा आवाज काहीसा नरम झाल्याचे चित्र शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांना बाबतीत पत्रकार परिषदेमध्ये दिसून आले आहे. अशाच बरे 2019 च्या निवडणुकीपूर्वी सोमय्या यांनी अनेक नेत्यांविरोधात आरोप केल्यानंतर ते सर्व नेते निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर या सर्वांचे चौकशीदेखील थंड पडल्याचे चित्र आहे. त्यामधील कोणकोणते नेते आणि विद्यमान कोणकोणत्या नेत्यांच्या चौकशी आणि प्रकरण काय आहे यासंदर्भातील आढावा
प्रताप सरनाईक :किरीट सोमय्या यांनी डिसेंबर 2020 मध्ये शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर अनधिकृत इमारत बांधली असल्याचा आरोप केला. प्रताप सरनाईक यांनी 250 कोटी रुपये लाटले असून विहंग हाऊसिंग स्किममध्ये मोठा घोटाळा केला आहे. त्या कंपनीवर कारवाई देखील झाली होती. आता त्या कंपन्याच अस्तित्वातच नाही आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला होता. या संबंधित कागदपत्रे त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयात सादर केले होते. यानंतर प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता. ईडीकडून प्रताप सरनाईक यांची प्रॉपर्टी देखील जप्त करण्यात आलेली आहे. सध्या प्रताप सरनाईक आणि कुटुंबीयांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
भावना गवळी :भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनकडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाने 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.
कोटींचा घोटाळा : याशिवाय भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.
आनंदराव अडसूळ :आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सिटी को-ऑप. बँकेचे अध्यक्ष असतांना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. या तक्रारीनंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून अडसूळ यांच्या रहात्या घरी आणि कार्यालय येथे धाडी टाकण्यात आल्या होत्या. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.
आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्यावर कारवाई :स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी आणि मुंबई महानगरपालिकेसाठी कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार अशा तब्बल 35 हून अधिक ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल 130 कोटी रुपये किंमतीच्या तीन डझन स्थावर मालमत्तांचे तपशील आणि पालिका कंत्राटदारांनी तब्बल 200 कोटींचे उत्पन्न लपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राप्तीकर विभागाने या कारवाईत 2 कोटींच्या रोख रकमेसह सुमारे दीड कोटींचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आयकर विभागाकडून जाधव कुटुंबीयांवर चार दिवस छापेमारी दिवस-रात्र सुरू होती.
अर्जुन खोतकर शिवसेना नेते :जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले होते की, मेसर्स जालना सहकारी कारखान्याची स्थापना 1984-85 मध्ये सुमारे 235 एकर जमिनीवर करण्यात आली होती. ज्यात 100 एकर जमीन महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय प्राप्त झाली होती. MSCB कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कारखाना अयशस्वी ठरला होता.
नारायण राणे :नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. राणे यांचे नीलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार आहेत. शेकडो कोटी रुपयांचे कर्ज, समभाग व उलाढाली आहेत. काही कंपन्या काढून कमी रुपयांचे समभाग दाखवून ते अधिक किंमतीला विकून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सप्टेंबर 2021मध्ये नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
कृपाशंकर सिंह :काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर सोमय्यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. मधू कोडांशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या व्यवहारांवरून सोमय्यांनी आरोप केले होते. कंपनी अफेअर्स खातं आणि ईडीकडे त्यांची तक्रारदेखील केली होती. ७ जुलै २०२१ रोजी कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमय्यांनी आरोप केलेल्या सिंह यांना भाजपनं उपाध्यक्षपद दिलं. मुंबई महापालिकेच्या तोंडावर सिंह यांनी भाजपनं मोठी जबाबदारी दिली.
माजी मंत्री बबनराव पाचपुते :माजी मंत्री बबनराव पाचपुतेंवर सोमय्यांनी फसवणुकीचा आरोप केला. पॉन्झी स्किमच्या माध्यमातून 10 लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. पाचपुतेंनी मंत्रिपदाचा वापर करून प्रकरण दाबल्याचा सोमय्यांचा दावा होता. 2014 च्या निवडणुकीआधी पाचपुते भाजपमध्ये गेले.
हेही वाचा :मुंबई मेट्रोचे सहार स्थानक प्रगतिपथावर; नवीन व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडेंचा कामाचा सपाटा