मुंबई -मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मोठी कारवाई केली आहे. काल रात्री उशिरा ही कारवाई विमानतळावर करण्यात आली. या कारवाईत मोठा अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा अमली पदार्थांचा साठा विदेशी नागरिकाकडून जप्त करण्यात आला आहे. हा विदेशी नागरिक आपल्या पोटामध्ये अमली पदार्थ कॅप्सूल स्वरूपात घेऊन आला होता. एनसीबीला याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याला अटक केली आहे.
विदेशी व्यक्तीच्या पोटातून जप्त करण्यात आले अमली पदार्थ
अमली पदार्थांचा साठा विदेशी नागरिकाकडून जप्त करण्यात आला आहे. हा विदेशी नागरिक आपल्या पोटामध्ये अमली पदार्थ कॅप्सूल स्वरूपात घेऊन आला होता. एनसीबीला याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ त्याला अटक केली आहे.
या आरोपीने गुन्हा करण्यासाठी विदेशी टॅकटिक्स वापरल्या आहेत. यामध्ये तस्करी करण्यासाठी त्याने आपल्या शरीराचा वापर केला आहे. शरीरात त्याने अमली पदार्थ कॅप्सूल स्वरूपात ठेवल्या आहेत. अशी माहिती मुंबई आणि गोवा येथिल एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली आहे. यात आरोपींनी प्रमाणापेक्षा जास्त अमली पदार्थ कॅप्सूल स्वरुपात आपल्या पोटात ठेवले होते. हे अत्यंत धोकादायक आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी येण्यात आले. त्यानंतर त्याच्या शरीरातून कॅप्सूल काढण्यात आले आहे. आत्तापर्यंत सात कोटी रुपयांचे ड्रग्स त्याच्या पोटातून बाहेर काढण्यात आले आहेत. पोटातून ड्रग्स काढण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू असल्याची माहिती आहे.
हेही वाचा-पेगासस हेरगिरी : एनएसओ ग्रुपशी कसलाही व्यवहार केला नसल्याचे सरकारचे स्पष्टीकरण