मुंबई - एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना अधिकाधिक मतमूल्याने निवडून आणण्यासाठी मुंबईतील हॉटेल लीला येथे भाजप नेत्यांची त्याचबरोबर शिवसेना बंडखोर आमदारांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रामदास आठवले, पियुष गोयल, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे भाजप प्रभारी सिटी रवी तसेच भाजपचे सर्व आमदार, खासदार त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाचे आमदार उपस्थित होते.
नितीन गडकरी उपस्थित - राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रोपदी मुर्मू यांच मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ शेजारी असलेल्या लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते.