महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

C 1.2 VARIANT लसीकरण केलेल्या नागरिकांनाही होऊ शकते लागण- डॉ. संजय ओक - महाराष्ट्र कोरोना अपडेट

कोरोना विषाणूचा सी.१.२ हा व्हेरियंट २१ मे रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. जगभरात या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट सर्वात संसर्गजन्य असल्याचे दिसत होते. मात्र, सी.१.२ हा व्हेरियंट अधिक गतीने पसरत आहे.

http://10.10.50.85//maharashtra/01-September-2021/mh-mum-c12-varient-7205149_01092021194141_0109f_1630505501_670.jpg
http://10.10.50.85//maharashtra/01-September-2021/mh-mum-c12-varient-7205149_01092021194141_0109f_1630505501_670.jpg

By

Published : Sep 1, 2021, 8:14 PM IST

Updated : Sep 3, 2021, 7:13 PM IST

मुंबई -राज्यात कोरोना, डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे. यापेक्षा अधिक गतीने पसरणाऱ्या सी.१.२ व्हेरियंटने जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढवली आहे. हा विषाणू किती गतीने पसरतो याची माहिती नाही. असे असले तरी लसीकरण केलेल्या नागरिकांनाही या व्हेरियंटची लागण होऊ शकते, अशी माहिती राज्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी दिली.

राज्यात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या दरम्यान कोरोना विषाणुमुळे पहिली लाट आली. डेल्टा या विषाणूमुळे दुसरी लाट आली. तर डेल्टा प्लसमुळे राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच जगभरात कोरोना विषाणूचा सी.१.२ हा व्हेरियंट पसरत आहे. या व्हेरियंटचा प्रसार किती प्रमाणात होतो? प्रसार होण्याची गती किती असते? याची माहिती उपलब्ध नाही. लसीकरण झालेल्या नागरिकांना या व्हेरियंटची लागण होऊ शकते का याबाबतची विचारणा डॉ. संजय ओक यांना विचारणा केली. लसीकरण केलेल्या नागरिकांनाही या व्हेरियंटची लागण होऊ शकते, असे ओक यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, की दक्षिण आफ्रिकेत सी १.२ हा नवीन व्हेरिएंट आला आहे. त्याचबरोबर जगातील चीन, न्यूझीलंड, इंग्लंड अशा देशांमध्ये देखील या विषाणूचे अस्तित्त्व सापडले आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू व्हेरिएन्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून जाहीर केलेला आहे. व्हेरिएन्ट ऑफ कन्सर म्हणून जाहीर केलेला नाही. त्यामुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरलेला नाही. त्यामुळे भारतात चिंता बाळगण्याची कारण नाही.

कोरोनामध्येही असंख्य व्हेरिएंट -

याप्रकारची जेव्हा जगात साथ येते तेव्हा विषाणूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हेरिएंट निर्माण होते. कोरोनामध्ये ही अशाच पद्धतीने असंख्य व्हेरिएंट तयार झाले आहे. मात्र, यात चिंतेचं कोणतंही कारण नाही. आज जगात ज्या लसी प्रचलित आहे. त्या सर्व लसी कोणत्याही व्हेरिएंटपासून आपल्याला ६० टक्के सरंक्षण देत असतात. त्यामुळे या लसीमुळे आपल्याला ६० टक्के संरक्षण मिळणार आहे. मात्र, जर असे लक्षात आले की या विषाणूमुळे आपल्याला बाधा जास्त प्रमाणात होत आहे तर मग कदाचित या लसींची पुढची पिढी शोधून काढावी लागणार आहे. जे नवीन व्हेरिएंट आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी नवीन लसीदेखील तयार कराव्या लागतील, असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले.

कोरोनाच्या नियमांचं पालन करणे गरजेचं -

सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने म्युटंट कुठलाही असला तरीसुद्धा मास्क, सोशल डिस्टंसिंग, हात स्वच्छ धुणे आणि आपल्याला जर लक्षणे आढळली तर त्वरित तपासणी करून उपचार करून घेणे, याचे पालन करावेच लागणार आहे. त्यामुळे भारतीय लोकांनी वेळेतच सावधान राहायला हवे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून आपण आत्ता कुठेतरी सावरत आहोत. त्यामुळे जर या पद्धतीच्या विषाणूची तिसरी लाट आली आणि आपण सावध राहिलो नाही तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जाव लागणार आहे, असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले.

१.२ व्हेरिएंटकडे अधिक लक्ष देणे आवश्यक -

दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिज (NICD) आणि क्वाजुलु-नेटाल रिसर्च इनोवेशन अँन्ड सीक्वेसिंग प्लॅटफॉर्मच्या संशोधकांनी या वर्षीच्या मेमध्ये देशात पहिल्यांदाच संभाव्य व्हेरिएंट C.1.2 चा शोध लावला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट सी.१.२ ने जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढवली आहे. डेल्टापेक्षा जास्त संक्रमण होत असलेल्या या व्हेरिएंटवर जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वॉन यांनी ट्विट केले आहे की, कोरोनाच्या सी.१.२ व्हेरिएंटकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, अशी माहितीही डॉ. भोंडवे यांनी दिली.

सी.१.२ व्हेरिएंट धोकादायक -
कोरोना विषाणूचा सी.१.२ हा व्हेरियंट २१ मे रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे. जगभरात या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट सर्वात संसर्गजन्य असल्याचे दिसत होते. मात्र, सी.१.२ हा व्हेरियंट अधिक गतीने पसरत आहे. यामुळे कोरोनाच्या सी.१.२ व्हेरिएंटकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असे ट्विट जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल प्रमुख डॉ. मारिया वॉन यांनी केले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत संपूर्ण जगाला डेल्टा व्हेरिएंटबाबत चिंता होती. मात्र, या नवीन व्हेरिएंटमुळे समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. या अभ्यासादरम्यान शास्त्रज्ञांना असेही आढळले आहे की, हा नवीन व्हेरिएंट शरीरातील लसीकरणाने बनलेल्या रोगप्रतिकारक शक्तीला सहज हरवू शकतो. पुन्हा एकदा सर्व लोकांसाठी कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात ५१,२३८ सक्रिय रुग्ण -
राज्यात ४,६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७२,८०० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४१९६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण १,३७,३१३ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३९ लाख ७६ हजार ८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६४ हजार ८७६ (११.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७०१ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ५१,२३८ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -
गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई- ३२३
रायगड- ८०
पनवेल पालिका -४६
अहमदनगर- ७८०
पुणे - ५७९
पुणे पालिका - २७७
पिपरी चिंचवड पालिका - १६३
सोलापूर- ३५८
सातारा - ४०८
कोल्हापूर - ६७
सांगली - २१४
सांगली मिरज कुपवाडा पालिका - ६४
सिंधुदुर्ग - ५०
रत्नागिरी - ११४
उस्मानाबाद- ७८
बीड- ९४

Last Updated : Sep 3, 2021, 7:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details