पणजी-सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. यामध्ये महायुतीच्या प्रचारासाठी गोव्यातील भाजप कार्यकर्ते राबत आहेत. तर, मुख्यमंत्री डॉ. सावंत मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले होते.
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार - डॉ. प्रमोद सावंत - गोवा भाजप बातमी
प्रमोद सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी युतीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त होईल
मंगळवारी ते एका पत्रकार परिषदेसाठी ते उपस्थित राहिले असता, त्यांना याविषयी विचारण्यात आले. त्यावेळी सावंत म्हणाले, फडणवीस यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद पाहता पुन्हा महायुतीचे सरकार बनेल आणि ते पुन्हा मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट आहे. यावेळी त्यांना मागच्या पेक्षा अधिक जागा मिळतील. 200 हून अधिक जागा त्यांना अपेक्षित आहेत.
आपण केलेल्या प्रचाराला कसा प्रतिसाद लाभला असे विचारले असता, डॉ. सावंत म्हणाले, मी चारपाच जिल्ह्यात जाहीर सभा, कोपरा बैठका, युवक आणि विचारवंतांशी चर्चा केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. तसेच अद्याप प्रचार कालावधी शिल्लक असून पक्षाने सांगितले तर एखाद्या दिवशी आणखी प्रचाराला जाणार असल्याचेही ते म्हणाले.