मुंबई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये मराठा समाजाची झालेल्या बैठकीनंतर संभाजी राजे छत्रपती Chhatrapati Sambhaji Raje यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी टीका केली आहे. संभाजी राजे यांचे नेतृत्व मान्य नाही त्यांनी आपला पक्ष सांभाळावा असे, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे, यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले Sambhajiraje Chhatrapati on Maratha reservation आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या, त्याकरिता आझाद मैदान येथे मी आमरण उपोषणही केले होते. तत्कालीन नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊन जी आश्वासने दिली होती, ती आता मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निवेदन मी त्यांना दिले होते. नियुक्त्यांचा विषय मार्गी लागला, हे त्या उपोषणाचेच यश आहे. समाजाच्या याच मागण्यांकरिता त्यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत सारथी संस्थेची स्वायत्तता, समाजासाठी अनेक योजना असे विषय मार्गी लागले. मात्र काही लोकांनी या बैठकीत शिष्टाचार पाळला नाही. मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काही जणांनी भर बैठकीत एकमेकांवरच पातळी सोडून वैयक्तिक टिप्पणी केल्याने मी शांततेचे आवाहन केले. मात्र हा प्रकार वारंवार होत राहिल्याने समाजाच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा तुमचं हेच चालू राहणार असेल, तर अशा पातळीहीन बैठकीत बसण्यापेक्षा मीच बाहेर जातो, तुमचं चालुद्या, अशी भूमिका मला घ्यावी लागली. मी कधीही कुणाचा आवाज दाबणे शक्य नाही, पण समाजाच्या नावाने उभे राहत असताना पातळीहीन वागून कुणी समाजाची नाचक्की करणार असेल, तर ते मी सहन करू शकत नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
आपले महत्त्व राखण्यासाठी समाजाची दिशाभूल करू नयेमराठा आरक्षणाच्या लढ्यात मी काही आज आलेलो नाही. २००७ पासून मी या चळवळीत पूर्णपणे सक्रिय आहे. माझा राजवाडा, घरदार , वैभवसंपन्न जीवनशैली सोडून मी महिनो महिने समाजासाठी राज्यभर फिरत असतो. संसदेत सुद्धा मराठा आरक्षणावर बोलणारा मी पहिला आणि कित्येक वर्षे एकमेव खासदार होतो. संसदेच्या प्रांगणात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे. २०१७ साली मुंबई येथे मोर्चाचा स्टेजवर जाऊन समाजाला दिशा दिली, यामुळे आपले मोठे राजकीय नुकसान होणार याची कल्पना असूनही स्वतःपेक्षा समाजाचा विचार केला.