महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशोत्सवादरम्यान धोकादायक पुलावर नाचू नका; मुंबई पालिकेच्या गणेशोत्सव मंडळांना सूचना

गणेशोत्सवादरम्यान धोकादायक पुलांवरुन मिरवणुका नेण्याची मागणी गणेश मंडळ व समन्वय समितीने पालिकेकडे केली होती. मात्र मुंबईमध्ये अनेक पूल धोकादायक झाले आहे. त्यामुळे पुलावर नाच गाणी करू नका, अशा स्पष्ट सूचना पालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 15, 2019, 10:04 PM IST

मुंबई- गणेशोत्सवादरम्यान मुंबईमधील धोकादायक पुलांवरून मिरवणुका नेण्याची मागणी गणेश मंडळ व समन्वय समितीने पालिकेकडे केली होती. मात्र मुंबईमध्ये अनेक पूल धोकादायक झाले आहे. त्यामुळे पुलावर नाच गाणी करू नका, अशा स्पष्ट सूचना पालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना केल्या आहेत.

मुंबई महापालिका मुख्यालयाजवळील हिमालय पूल कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने मुंबईमधील सर्वच पुलांचे ऑडिट केले. या ऑडिटमध्ये 29 पूल धोकादायक असल्याचे समोर आले. 29 पैकी 8 धोकादायक पूल पाडण्यात आले आहेत. तर 12 पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोकादायक पुलांपैकी काही पुलांच्या पुनर्बांधणीचे कामाल ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र गणेशोत्सव 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान असल्याने धोकादायक पुलांवर दुर्घटना घडू नये, याची काळजी पालिका प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

पुलावर नाचगाणी केल्यास मिरवणुकीतील गणेशभक्तांच्या वजनाने पूल कोसळण्याची भीती आहे. त्यासाठी प्रशासनाने मंडळांना पुलावर नाच गाणी करू नका, पुलावरून शांततेत मिरवणुका घेऊन जावे तसेच पुलावर रेंगाळत बसू नका, अशा सूचना केल्या आहेत. यामुळे येत्या गणेशोत्सवात गणेश मंडळांना पुलावरून जाताना काळजी घ्यावी लागणार आहे.

धोकादायक पूल -
वाकोला पाइप लाइन सर्व्हिस रोड ब्रीज, जुहू तारा रोड ब्रीज, धोबी घाट मजास नाला ब्रीज, मेघवाडी नाला ब्रीज शामनगर अंधेरी, वांद्रे-धारावी मिठी नदी ब्रीज, रतननगर-दौलतनगर ब्रीज कांदिवली, ओशिवरा नाला एसव्ही रोड गोरेगाव ब्रीज, पिरामल नाला ब्रीज लिंकरोड गोरेगाव, चंदावडकर नाला ब्रीज मालाड, गांधीनगर कुरार व्हिलेज मालाड ब्रीज, प्रेमसागर नाला एसव्ही रोड ब्रीज मालाड, फॅक्ट्री लेन बोरिवली ब्रीज, कन्नमवारनगर घाटकोपर, लक्ष्मीबाग नाला ब्रीज घाटकोपर,नीलकंठ नाला घाटकोपर

पश्चिम उपनगरातील धोकादायक पूल -
हंस बुग्रा मार्ग, पाइपलाइन सर्व्हिस रोड ब्रीज, वलभाट नाला ब्रीज, विठ्ठल मंदिर इरानी वाडी रगडापाडा ब्रीज, एसव्ही रोड कृष्णकुंजजवळील ब्रीज, आकुर्ली रोड, हनुमान नगर ब्रीज, ओशिवरा नाला, एसव्ही रोड ब्रीज, पिरामल नाला, लिंक रोड, एसबीआय कॉलनी ब्रीज, रतन नगर ते दौलत नगर ब्रीज

पूर्व उपनगरातील धोकादायक पूल -
पूर्व उपनगरात आढळलेल्या सात धोकादायक पुलांपैकी चार पूल तोडण्यात आले असून कुर्ला येथील हरी मस्जीत नाला, लक्ष्मी बाग कल्हर्ट नाला ब्रीज, घाटकोपर निकांथ ब्रीज

ABOUT THE AUTHOR

...view details