डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात, राज्य सरकारची केंद्राकडे कारवाईची मागणी - दाऊद इब्राहिम
दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे, अशी माहिती हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊद इब्राहिमची भाचा अलिशा पारकर याने ईडीला दिली. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करणार्या ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान हसिना पारकर यांचा मुलगा अलिशा पारकरने ईडीला ही माहिती दिली.
डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये अलिशा पारकर ईडीला माहिती- सूत्र
मुंबई -अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे, अशी माहिती हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊद इब्राहिमची भाचा अलिशा पारकर याने ईडीला दिली. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करणार्या ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान हसिना पारकर यांचा मुलगा अलिशा पारकरने ईडीला अनेकप्रकारची माहिती ईडीला दिल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊदचा पुतण्या अलिशा पारकरला ईडीने अनेकवेळा चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
दिलीप वळसे पाटील यांची केंद्राकडे कारवाईची मागणी - दरम्यान यासंदर्भात केंद्रसरकारने कारवाई केली पाहिजे अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. आतापर्यंत दाऊदचा ठावठिकाणी माहीत नव्हता. आता तो समजला पाहिजे. त्यामुळे केंद्राने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली.
Last Updated : May 24, 2022, 2:07 PM IST
TAGGED:
दाऊद इब्राहिम