महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आयुर्वेदिक सर्जरीविरोधात राज्यभरात डॉक्टरांची निदर्शने - protest against ayurveda surgery

केंद्र सरकारने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली असून या निर्णयाला देशभरातील डॉक्टरांनी जोरदार विरोध केला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

protest against ayurveda surgery
आयुर्वेदिक सर्जरीविरोधात राज्यभरात डॉक्टरांची निदर्शने

By

Published : Dec 9, 2020, 4:50 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली असून या निर्णयाला देशभरातील डॉक्टरांनी जोरदार विरोध केला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाअंतर्गत आज आयएमए, महाराष्ट्रकडून राज्यभर निदर्शने करण्यात आली. तर आता 11 डिसेंबरला देशभरातील डॉक्टर 12 तासांसाठी संपावर जाणार आहेत.

आयुर्वेदिक सर्जरीविरोधात राज्यभरात डॉक्टरांची निदर्शने
'आयुष' डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी

केंद्र सरकारच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने आयुर्वेदिक शस्त्रक्रिया करण्यास 'आयुष' डॉक्टरांना, एमएस करणाऱ्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. तसा अभ्यासक्रम येणाऱ्या काळात समाविष्ट करण्यात येणार आहे. तर 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ही परवानगी आहे. मेंदूच्या शस्त्रक्रिया अवयव प्रत्यारोपण वैगरे त्यांना करता येणार नाही. कान-नाक-घसा, डोळे, पोट आतडे आणि मूत्राशय यासारख्या शस्त्रक्रिया त्यांना करता येणार आहेत.

केंद्र सरकारने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली असून या निर्णयाला देशभरातील डॉक्टरांनी जोरदार विरोध केला आहे.
निर्णय रद्द करण्याची आयएमएची मागणीया निर्णयाला आयएमएने मात्र विरोध केला आहे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील 58 शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देणे म्हणजे हा रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे. तर हा ऍलोपॅथी डॉक्टरांवर अन्याय असल्याचे म्हणत आयएमए डॉक्टरांनी याला विरोध केला आहे. त्यामुळेच हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठीच 2 डिसेंबरपासून राज्यभर आयएमएने आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज राज्य भर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी, निवासी डॉक्टरांनी, ज्युनियर डॉक्टरांनी आणि आयएमए डॉक्टरांनी निदर्शने केली. आजचे आंदोलन 100 टक्के यशस्वी

आज आयएमएच्या 219 शाखेत 400 शहरात 45 हजार डॉक्टरांनी निदर्शने केली. तर 5 हजार विद्यार्थ्यांनी आणि 10 हजार ज्युनियर डॉक्टरांनी सहभाग घेतल्याची माहिती डॉ.अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र यांनी दिली आहे. तर आता 11 डिसेंबरला सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत देशभरातील डॉक्टर संपावर जाणार आहेत. कोरोना रुग्णसेवा वगळता इतर सेवा यावेळी बंद राहणार आहे. या आंदोलनानंतरही केंद्राने जर आमची मागणी मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे. त्यामुळे येत्या काळात डॉक्टर विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details