मुंबई - सांताक्रुज पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमैया यांना नोटीस बजावल्याने सोमैया आता सांताक्रुजच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी 'मी कोविड काळात छगन भुजबळ यांच्या संपत्तीची पहाणी केल्यामुळे मला ही नोटीस आली आहे.' (Press conference by Kirit Somaiya) असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
मी घाबरत नाही
सोमैया म्हणाले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती किरिट सोमैया यांना एका आठवड्यात जेलमध्ये जाव लागेल. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत सांगतायत बाप लेक जेल मध्ये जातील. (kirit Somaiya On Sanjay Raut) या अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही असही ते म्हणाले आहेत.
म्हणून मला नोटीस
"मी छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती म्हणून भुजबळ दोन वर्ष तुरुंगात जाऊन आले. कोविड काळात मी छगन भुजबळ यांच्या संपत्तीची पहाणी केली होती. (Kirit Somaiya Visiting Korlai Alibag) म्हणून मला ही नोटीस आली आहे. पण, मी जेलमध्ये जाण्यास बिलकुल घाबरत नाही." अशी प्रतिक्रिया सोमैया यांनी दिली आहे.
१९ बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागेल
"शिवराळ भाषेचा वापर करून राऊत विषय डायर्वट करत आहेत. माझ्या आणि ईडी संदर्भात संजय राऊत जे बोलतात त्या संदर्भात मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. उद्धव ठाकरेंना १९ बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागेल."Conclusion: