मुंबई - समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede appeal) यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपण किंवा आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतीही वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर करू नयेत किंवा कोणतेही आरोप करू नयेत, या करिता मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांना कुठलाही दिलासा दिला नाही. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी दोन सदस्य खंडपीठाकडे व्हावी, अशी अपील एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede appeal bombay high court) यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे.
हेही वाचा -रविवारी मुंबईत होणार संयुक्त शेतकरी महापंचायत, महाविकास आघाडीची लाभणार साथ
ज्ञानदेव वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्य खंडपीठाकडे या विषयाची त्वरीत सुनावणी घ्यावी, अशी मागणी आपल्या याचिकेत केली आहे. त्यांची ही याचिका न्या. कथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणीला येण्याची शक्यता आहे. सोमवारी न्या. माधव जमादार यांच्या एक सदस्य खंडपीठाने वानखेडे याची अपील फेटाळून लावत नवाब मलिक यांच्या वक्तव्यांवर सरसकट बंदी घालता येणार नाही, असे म्हटले होते.
वानखेडे यांनी आपला मुलगा आणि कुटुंबाबत वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यास मलिक यांना विरोध करण्याची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अशा पोस्ट न करण्यास मनाई न करता उलट अशा पोस्टमध्ये प्रथमदर्शनी सत्य असल्याचे वाटत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यामुळे, आता या निर्णयाला ज्ञानदेव वानखेडे यांनी दोन सदस्य खंडपीठासमोर आव्हान दिले आहे.
हेही वाचा -शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा- अजित पवारांचे निर्देश