महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Coastal Road Project : कोस्टल रोडवरील दोन खांबांतील अंतर ६० मीटर पुरेसे - राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था - कोस्टल रोड प्रकल्प

सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत दोन खांबांतील अंतर ६० मीटर म्हणजे २०० फूट एवढे पुरेसे आहे, असा निष्कर्ष राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेने ( National Institute of Oceanography ) याने दिला आहे. एक अहवाल सागरी किनारा रस्ता प्रकल्प ( Coastal Road Project ) कार्यालयास सादर केला आहे. यात प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या २ खांबांमधील अंतराबाबत निरीक्षण नोंदवले असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर ( Chief Engineer of project Chakradhar Kandalkar ) यांनी दिली आहे.

कोस्टल रोड प्रकल्प
कोस्टल रोड प्रकल्प

By

Published : May 18, 2022, 8:45 PM IST

मुंबई -कोस्टल रोड म्हणजेच सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत दोन खांबांतील अंतर ६० मीटर म्हणजे २०० फूट एवढे पुरेसे असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेने दिला आहे. ही समुद्र विषयक बाबींचा अभ्यास व संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. या संस्थेद्वारे सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत खांबांमधील अंतर या विषयावरील अभ्यासपूर्ण अहवाल सागरी किनारा रस्ता प्रकल्प ( Coastal Road Project ) कार्यालयास सादर केला आहे. यात प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या २ खांबांमधील अंतराबाबत निरीक्षण नोंदवले असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता चक्रधर कांडलकर ( Chief Engineer of project Chakradhar Kandalkar ) यांनी दिली आहे.

५३ टक्के काम पूर्ण :बृहन्मुंबई महानगरपालिकेने ऑक्‍टोबर २०१८ पासून शामलदास गांधी मार्ग (प्रि‍न्‍सेस स्‍ट्रि‍ट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे वरळी सागरी सेतू) च्‍या वरळी टोकापर्यंत मुंबई कोस्‍टल रोड प्रकल्‍पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत प्रकल्‍पाचे ५३ टक्‍के काम पूर्ण झालेले असून किनारी रस्‍ता प्रकल्‍प येत्या डिसेंबर, २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वरळी येथील 'क्लिव्हलँड जेट्टी'मधून मच्छिमारांच्‍या बोटींना ये-जा करण्‍यासाठी समुद्रातील किनारी रस्‍ता प्रकल्‍पामधील पुलाच्‍या दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी २०० मीटर ठेवण्‍याची मागणी स्‍थानिक मच्छिमारांकडून करण्‍यात येत आहे. राष्‍ट्रीय समुद्र विज्ञान संस्‍था यांनी किनारी रस्‍ता प्रकल्‍पासाठी जुलै २०१७ मध्‍ये अभ्यास अहवाल तयार केला. "समुद्र लाटा, कमाल पाण्याची पातळी, वादळी लाटा, त्सुनामीच्या लाटांची उंची आणि समुद्रतळाशी होणारे बदल" याबाबत केलेल्या अभ्यासातून अहवाल आहे. यात डॉ. सुरेंद्र सी. ठाकूरदेसाई यांनी वादळी लाटा विचारात घेऊन बोटींच्‍या सुरक्षित वाहतुकीसाठी दोन पिलरमधील कमीत कमी अंतर १६० मीटर असण्‍याची आवश्‍यकता आहे, असे नमूद केले आहे.


सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना :खांबाभोवती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतिबंधक कवच म्हणजेच 'फेंडर' बसविण्यात येणार आहेत. यामुळे जलवाहतुक मार्गिकेमधून ये-जा करणा-या बोटींना नुकसान होणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी जलवाहतूक मार्गिकांवर थेट नियंत्रण कक्षाशी जोडलेले अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामधील प्रस्तावित जलवाहतूक मार्गिकांच्या खांबावर आदळून बोटींचा अपघात झाल्यास महानगरपालिकेतर्फे पुढील २० वर्षांचा विमाहप्ता भरण्याची तरतूद असणार आहे.

हेही वाचा -Shared An Inspiring Post : आयएएस अधिकाऱ्याने शेअर केली रस्त्यावरील दिव्यांग विक्रेत्याची प्रेरणादायी पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details