मुंबई -शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय झाला नसताना, राज्यातील काही कनिष्ठ विद्यालयांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करण्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. हा संभ्रम दूर करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी एक परिपत्रक काढत कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा -सेवाव्रती! गरोदर असतानाही महिला पोलीस कर्तव्यासाठी ऑन ड्युटी!
विद्यार्थी- पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण-
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच नागपूर नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या सहा महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात आणि उर्वरित महाराष्ट्रातील अकरावीचे प्रवेश स्थानिक पातळीवरून केली जाते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. मात्र, राज्यातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करण्याची माहिती समोर आली आहे. पण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी- पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी आल्या होत्या.
कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना-
शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी गुगल फॉर्म सारख्या सामाजिक माध्यमांद्वारे अर्ज मागविणे सुरु केले असलेचे आम्हाला निदर्शनात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. राज्यातील 2021-22 मधील अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येतील. तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया आपले स्तरावर सुरु करु नये व विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल अशा प्रकारच्या सूचना दिल्या जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी असा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी दिली आहे.
हेही वाचा -सरकारच्या गोंधळलेपणाने दहावी परीक्षा रद्द करण्याचा अतार्किक निर्णय - याचिकाकर्ते कुलकर्णी