मुंबई - बेस्ट कृती समितीच्या आजच्या मेळाव्यात बेस्ट कामगारांचा संप तूर्तास टळला आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाने आडमुठी भूमिका घेऊन बेस्ट कामगारांच्या वेतन कराराबाबत निर्णय न घेतल्यास 23 तारखेनंतर कोणताही कामगार मेळावा न घेता बेस्ट कृती समिती संपाची हाक देईल. वेळेनुसार बेस्ट कामगार संपात उतरतील, असा ठराव मंगळवारी झालेल्या मेळाव्यात घेण्यात आल्याचे बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
बेस्ट कामगारांचे मतदान घेऊन ठरवणार संपाची दिशा - शशांक राव - बेस्ट कामगारांचा संप तूर्तास टळला
पाच तारखा बेस्ट उपक्रमाला वाटाघाटी देण्यात आल्या होत्या, त्या आज संपल्या आहेत. 19 व 20 ऑगस्ट या शेवटच्या दोन दिवशी बेस्ट प्रशासनाकडून काहीही म्हणणे आले नाही. त्यामुळे संप करायचा की नाही याबाबत येत्या 23 ऑगस्टला सर्व बेस्ट आगारांमध्ये सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामगारांमध्ये मतदान घेतले जाईल.
पाच तारखा बेस्ट उपक्रमाला वाटाघाटी देण्यात आल्या होत्या, त्या आज संपल्या आहेत. 19 व 20 ऑगस्ट या शेवटच्या दोन दिवशी बेस्ट प्रशासनाकडून काहीही म्हणणे आले नाही. त्यामुळे संप करायचा की नाही याबाबत येत्या 23 ऑगस्टला सर्व बेस्ट आगारांमध्ये सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कामगारांमध्ये मतदान घेतले जाईल. दुसऱ्या दिवशी 24 तारखेला एक वकील नेमून मतमोजणी होईल. बेस्ट कामगार आपला एक दिवसांचा पगार पूरग्रस्त भागासाठी देणार असून तो निधी मुख्यमंत्री सहायता फंडात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाईल, असे राव यांनी सांगितले.