महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Param bir Singh suspension परमबीर सिंग यांना निलंबित करण्याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया

गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले, की परमबीर सिंग ( Dilip Walse Patil on Parambir Singhs suspension ) यांच्याबाबतीत जी कार्यवाही करायची आहे, ती पुढे सुरू राहील. त्यांची काय चुक आहे, ते पाहिले जाईल. परमबीर सिंग यांना निलंबित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत कायदेशीर सल्लामसलत करू. त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ.

दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील

By

Published : Nov 26, 2021, 3:37 PM IST

Updated : Nov 26, 2021, 5:21 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर बरेच गुन्हे दाखल असल्याकारणाने त्यांच्या निलंबनाची मागणी जोर धरत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग ( Parambir Singh over 100 crore extortion ) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणाचा आरोप केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी झाल्या आहेत. तसेच राजकारण तापू लागले आहेत. एकीकडे या संबंधांमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले होते.

हेही वाचा-Constitution Day: संविधानातील मार्गदर्शक तत्वांबाबत जागरूक राहुया - मुख्यमंत्री उद्ध ठाकरे

परमबीर सिंग गुरुवारी मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झालेला आहे. एकंदरीत या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या सर्व बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( Dilip Walse Patil on Parambir Singhs suspension ) यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Param bir Singh Investigation : परमबीर सिंग यांची ठाणे पोलीस ठाण्यात चौकशी सुरू, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा

काय म्हणाले गृहमंत्री ?
गृहमंत्री दिलीप वळसे म्हणाले, की परमबीर सिंग यांच्याबाबतीत जी कार्यवाही करायची आहे, ती पुढे सुरू राहील. त्यांची काय चुक आहे, ते पाहिले जाईल. परमबीर सिंग यांना निलंबित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत कायदेशीर सल्लामसलत करू. त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ.

हेही वाचा-Param Bir Singh : फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करण्यासाठी परमबीर न्यायालयात


परमबीर सिंग यांच्या जीवाला धोका असल्याचे ऐकून धक्का

जे काही सांगायचे ते न्यायालयात सांगू, असे गुरुवारी परमबीर सिंग यांनी सांगितले. परमबीर सिंग यांच्या जीवाला मुंबईत धोका असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. यावर गृहमंत्री म्हणाले की, परमबीर सिंग यांना मुंबईत जीवाला धोका वाटत असल्याचे ऐकून धक्का बसला आहे. मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंग यांनी काम केले आहे. इतकी महत्वाची पदे भूषवलेल्या व्यक्तीला जीवाला धोका वाटत असल्याचे जाणून धक्का बसला. एखाद्याकडून त्यांना धोका आहे, असे वाटत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही त्यामध्ये लक्ष घालू, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले होते.

परमबीर सिंग यांचे चहा देऊन स्वागत

आज सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या परमबीर सिंग ( Parambir Singh, Former Commissioner of Police mumbai ) यांच्या चौकशीनंतर ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) त्यांना चहा देऊन स्वागत केले. त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. दुपारी सुरू होऊन आता काही तास झालेले आहेत. अशावेळी या गुन्ह्यातील तक्रारदार सोनू जालान ( Sonu Jalan ) यांनी या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Last Updated : Nov 26, 2021, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details