मुंबई -भारतीय जनता पक्षाचे नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना उद्देशून एक वक्तव्य केलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातल वंशवादी संपवायचा आहे. मात्र, ते मला संपवू शकणार नाहीत." पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर तिथेच पंकजा मुंडे हे आपल्याच पक्षात नाराज ( Pankaja Munde upset with BJP? ) आहेत का ? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Dhananjay Munde On Pankaja Munde : पंकजा मुंडे नाराज असल्याच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे म्हणाले... - Pankaja Munde being unhappy with BJP
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे ( Congress leader Dhananjay Munde ) म्हणाले की, पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) त्यांच्या पक्षात नाराज ( Pankaja Munde upset with BJP? ) आहेत का नाही हे मी सांगू शकत नाही. आपल्या पक्षात कोण नाराज आहे याबाबत त्यांनी भावना व्यक्त केल्या असे ते म्हणाले.
या प्रकरणावर धनंजय मुंडे म्हणाले -यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे ( Congress leader Dhananjay Munde ) म्हणाले की, पंकजा मुंडे त्यांच्या पक्षात नाराज आहेत का नाही हे मी सांगू शकत नाही. आपल्या पक्षात कोण नाराज आहे याबाबत त्यांनी भावना व्यक्त केल्या. एखादा नेता त्यांच्या पक्षात नाराज असेल याबाबत आमच्या प्रवक्त्याने काही भूमिका मांडली असेल तर, ती त्या वेळची परिस्थिती असते असे या प्रकरणावर धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
पंकजा मुंडेंते स्पष्टीकरण - पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला राजकारणातून संपवू शकणार नाहीत असे वक्तव्य केल्यानंतर अनेक उलट उलट चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचा कोणी प्रयत्न करते का? तसेच वंशावादाचा ठपका मुंडे कुटुंबावर ठेवला जातोय का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेने जात आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आपण कुठेही नकारात्मक पद्धतीने केलेला नाही. सध्याच्या काळात सर्वात धुरंदर राजकीय नेतृत्व म्हणून मोदींचा उल्लेख आपण केला असल्याचा स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडून देण्यात आल आहे.