महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्याने केंद्रासोबत चर्चा सुरू केली याचा आनंदच; फडणवीस यांची मोदी-ठाकरे भेटीनंतर प्रतिक्रिया - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बातमी

आरक्षणसंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू केली याचा आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी मोदी-ठाकरे भेटीनंतर दिली आहे.

fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 8, 2021, 3:22 PM IST

Updated : Jun 8, 2021, 5:40 PM IST

मुंबई -आरक्षणसंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू केली याचा आनंदच आहे. त्यामुळे काहीही कृती न करता फक्त केंद्र सरकारला भेटून काही उपयोग नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकडे सकारात्मक दृष्टीने पाहू, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोदी-ठाकरे भेटीनंतर दिली आहे.

माहिती देताना देवेंद्र फडणवीस

हेही वाचा -खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने केले रद्द

दरम्यान, राज्य सरकारने वेळीच कृती न केल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. काहीही कृती न करता फक्त केंद्र सरकारवर टीका करणे चुकीचे आहे. त्यामुळे या भेटीकडे सकारात्मक बघू, असे फडणवीस म्हणाले. तसेच टीका न करता चर्चा केली तर नक्कीच महाराष्ट्राला फायदा होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्यक्तिक भेट झाली असेल तर स्वागतच आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

  • मोदी-ठाकरे यांची झाली भेट -

आज राजकीय वर्तृळात अनेक घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोसावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित आहेत. दरम्यान, दिल्लीत मोदी-ठाकरेंच्या या बैठकीनंतर महाराष्ट्रात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर उपस्थित होते.

  • मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचीही घेतली होती भेट -

मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे.

हेही वाचा -पुणे आग दुर्घटना : परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही; घटनास्थळावरुन 'ईटीव्ही भारत'चा आढावा

Last Updated : Jun 8, 2021, 5:40 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details