महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis Political Policy : चाणाक्ष, धोरणी आणि महत्त्वाकांक्षी नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस! - महत्त्वाकांक्षी वृत्तीचा प्रवास

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांचा उदय झाला आहै. गेल्या अडीच वर्षांत सत्तेपासून दूर असतानाही सातत्याने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील ( Effortful Devendra Fadnavis ) असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सत्तेला गवसणी घातली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशित तयार झालेल्या ( Formed in The RSS ) देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात ( Started Work as a BJP Worker ) केली. देवेंद्र फडणवीस यांच्या याच महत्त्वाकांक्षी वृत्तीचा प्रवास ( A Journey of Ambitious Attitude ) जाणून घेऊया....

Leader of Opposition Devendra Fadnavis
विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 30, 2022, 1:51 PM IST

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांचा उदय झाला आहे. गेल्या अडीच वर्षांत सत्तेपासून दूर असतानाही सातत्याने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सत्तेला गवसणी घातली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी वृत्तीचा प्रवास ( A Journey of Ambitious Attitude ) जाणून घेऊया....

धोरणी देवेंद्र फडणवीस :भारतीय जनता पक्षाने 2014 नंतर देशभरात आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली आहे. भाजपने आत्मसात केलेलं निवडणुकीचे नव तंत्र निवडणुका जिंकण्यासाठी सातत्याने कष्ट करण्याची आणि त्याच दृष्टीने प्रयत्न करण्याची तयारी तसेच निवडणुका जिंकण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करणे हाच उद्देश भारतीय जनता पक्षाने ठेवल्याने अनेक राज्यांमध्ये त्यांना आपली ताकद निवडणुकीच्या माध्यमातून वाढवता आली आहे. महाराष्ट्रातही 2014 नंतर भाजपने आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली 2019 मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यामुळे भाजपला बहुमत मिळूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. मात्र, मी पुन्हा येईन, असा विश्वास व्यक्त केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार पाडून पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन करण्याचा स्थितीत येऊन दाखवले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वृतीबदल आणि प्रवासाबद्दल काही महत्त्वाचे टप्पे आहेत.

नागपुरात नगरसेवक म्हणून सुरुवात : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशित तयार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नागपूरमध्ये नगरसेवक ते महापौर ही पदे मिळवली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाजपचा तिकिटावर प्रवेश मिळवला आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचा नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क आला आणि त्यानंतर मोदी यांनी गडकरी आणि मुंडे यांच्यातील दुवा म्हणून फडणवीस यांचा वापर केला. या संधीचे फडणवीस यांनी सोनं केले.

2014 मध्ये मुख्यमंत्री :2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला संख्याबळ सर्वाधिक मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली ती पक्षातील दिग्गज नेत्यांना बाजूला सारून. फडणवीस यांच्या नेतृत्वाला पक्षातून काही प्रमाणात आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यासारख्या नेत्यांना त्यांनी पक्षात राहूनच प्रभावहीन करून टाकले. पक्षांतर्गत विरोधक संपवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजकीयदृष्ट्या स्वतःचे महत्त्व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

बिहार आणि गोवा निवडणुकीत करिश्मा :पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार आणि गोवा या दोन राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवली होती. या दोन्ही राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कौशल्याने आणि बुद्धीचा चातुर्याने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाले.

विधान परिषद राज्यसभा निवडणुकीत यश :गेल्या अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत राज्य सरकारच्या धोरणांवर अधिक टीका करण्यापेक्षा राज्यातील नेत्यांच्या भ्रष्ट कारभारावर अधिक बोट ठेवत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. या सरकारबद्दल जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसतानासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनबद्ध आखणी करून पक्षाच्या सर्व जागा जिंकून दाखवल्या यामुळे केंद्रातील पक्षश्रेष्ठी आणि राज्यातील सर्व नेते पुन्हा एकदा देवेंद्र यांच्या कार्य कौशल्यावर खूश झाले आहेत. त्या पाठोपाठ भाजपला सत्तेपासून दूर रोखणाऱ्या शिवसेनेतच फूट पाडण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आणि एकनाथ शिंदे सह 50 आमदारांचा गट त्यांनी आपल्या दावणीला बांधला.

महत्त्वाकांक्षी देवेंद्र :मी पुन्हा येईन! या आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या आणि महत्त्वाकांक्षी वक्तव्याची मधल्या काळात खूपच टीकात्मक आणि खिल्ली उडवण्यात आली. मात्र, सत्ता मिळवण्यासाठी केवळ राजकारण माहिती असून चालत नाही ते योग्य प्रकारे करता आले पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून देत महाविकास आघाडीला सुरुंग लावत पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची तयारी चालवली आहे. पुन्हा एकदा "सब कुछ देवेंद्र" अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली असली तरी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यासारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलूनही त्यांना चालणार नाही.

हेही वाचा :Maharashtra Gov Formation 2022 : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांचे पहिले ट्विट, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details