मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गुजराती मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी गुजराती प्रचार करत मेळावा भरवणार असल्याचे सांगत आहे. यावर किमान निवडणुकीच्या दृष्टीने तरी शिवसेनेला गुजराती लोकांची आठवण आली हे चांगले आहे, शिवसेना म्हणजे नौटंकी सेना, नाटक कंपनी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शिवसेना काय करेल सांगता येत नाही -
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना काय करेल सांगता येत नाही. बाळासाहेबांना जनाब केले, अजाण स्पर्धा भरवतील आणि काय काय करतील. किमान निवडणुकीच्या दृष्टीने तरी शिवसेनेला गुजराती लोकांची आठवण आली चांगलं आहे, शिवसेना म्हणजे नौटंकी सेना, नाटक कंपनी असे ते म्हणाले. वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की यांना वेगवेगळ्या गोष्टी आठवतात. मात्र, निवडणुकांआधी त्या यांना आठवत नाहीत
शिवसेना आणि काँग्रेस ठरवून करत आहे -
औरंगाबादचा नामांतरण करण्या विषयी राजकारण शिवसेना आणि काँग्रेस ठरवून करत आहे. निवडणुकीच्या दृष्टीने हे सर्व चाललेला आहे. ते गांभीर्याने सरकार चालवत नाही आहेत. आज इतके वर्ष सत्तेत असूनही काही करता आलेले नाही, हे नुसते पत्र पाठवतात असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
राऊत सोडून द्याना ते बोलण्याच्या लायक नाहीत -