मुंबई -महाविकास आघाडी सरकार विरोधात असलेला असंतोष विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाहेर आलेला आहे. लोकाभिमुख सरकार राज्यात स्थापन झाल्या नंतरच भारतीय जनता पक्षाचा संघर्ष थांबेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला.
Devendra Fadnavis on Vidhan parishad : राज्यात लोकाभिमुख सरकार स्थापन होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis over election win
महाविकास आघाडी सरकार विरोधात असलेला असंतोष विधानपरिषदेच्या ( Devendra Fadnavis on vidhan parishad election ) निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बाहेर आलेला आहे. लोकाभिमुख सरकार राज्यात स्थापन झाल्या नंतरच भारतीय जनता पक्षाचा संघर्ष थांबेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी या विजयानंतर ( vidhan parishad election win ) महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
राजकारणात चमत्कार वगैरे आपण मानत नाही. मात्र, सरकार विरोधात असलेला असंतोष मतातून बाहेर पडला. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या आमदारांकडून देखील मतदान झाले. मत फुटली असे कयास लावले जात असले तरी, हा सरकार विरोधात असंतोष असल्याचे फडवणीस यावेळी म्हणाले.
सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आमदारांनी केले मतदान -महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. म्हणून आमदारांनी आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून भारतीय जनता पक्षाच्या पाचव्या उमेदवाराला विजयी केले. राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 123 मत घेतली होती. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत हाच आकडा 134 वर गेला. भारतीय जनता पक्षाच्या पाचव्या उमेदवारासाठी एकही मत नसताना काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासावर विश्वास ठेवूनच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -Bacchu Kadu : भविष्यात प्रहारचा मुख्यमंत्री होईल; बच्चू कडू यांना विश्वास