महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींचा खर्च, मग शेतकऱ्यांना द्यायला का पैसे नाहीत, फडणवीसांचा सरकारला सवाल

एकीकडे कोरोनामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट असताना राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची बाब समोर येतेय. सार्वजनिक बांधकाम विभागाने विरोधीपक्षनेत्यांच्या बंगल्यासह ३१ बंगल्यांच्या दुरुस्तीच्या निविदा काढल्यात. दरम्यान तुम्ही बंगल्यावर खर्च करता मग शेतकऱ्यांना का पैसे देत नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय.

devendra fadanavis
फडणवीसांचा सरकारला सवाल

By

Published : Dec 14, 2020, 7:18 PM IST

मुंबई -तुम्ही बंगल्यावर खर्च करता मग शेतकऱ्यांना का पैसे देत नाही, असा सवाल फडणवीस यांनी सरकारसमोर उपस्थित केला आहे.

ठाकरेंनी जग व देशावर न बोलता राज्यातील परिस्थितीवर बोलावे - फडणवीस

फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलावे, मराठा आरक्षणावर बोलावे. त्यांना महाराष्ट्रातील स्थिती दिसत नाही का? राज्यात ज्या प्रमाणे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यास रोखले जात आहे. तसे दिल्लीत शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास रोखले नसल्याचे फडणवीस म्हणाले.

६ तासात १० विधेयके, मग अन्य मुद्दयावर चर्चा कधी -

ठाकरेंनी जग आणि देशावर न बोलता महाराष्ट्रातील परिस्थितीवर बोलावे असा टोलाही फडणवीस यांनी हाणला. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, वीज माफ झालं पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना, मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना आता हे सरकार हे पळ काढत आहे. 6 तासांच्या अधिवेशनात 10 विधेयके या सरकारने दाखवली आहेत. लोकांचे प्रश्न मांडता येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये म्हणून आता पळ काढला जातो. अधिवेशनात १० विधयके, मग इतर मुद्यांवर चर्चा कधी करायची असा सवाल फडणवीस यांनी केला.

सरकारची हिटलरशाही सुरू आहे, धनगर समाजाच्या प्रश्नासाठी आमदार आंदोलन करत असताना सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे, हे सरकार मराठा ओबीसी आणि धनगर समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details