मुंबई आज दिवसाची सुरुवात अतिशय वाईट झाली. विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मॅसेज केला होता. मी सकाळी वाचला आणि बोलणे राहून गेले. ही सल मनात कायम राहून जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Fadnavis Reaction on Death of Mete यांनी दिली. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर फडणवीस प्रसार माध्यमांशी बोलत होते. Shiv Sangram leader Vinayak Mete
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात मेटे यांचे निधन झाले. मेटे यांच्या निधनानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जातो आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मला मॅसेज पाठवला होता. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे त्याच्यासाठी मी येतोय. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो असा उल्लेख मॅसेजमध्ये आहे. मी आज तो सकाळी वाचला असे फडणवीस यांनी सांगताना बोलणे अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त केली.