महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठाकडून आयडॉलमधील सुविधा अद्ययावत करण्याकडे दुर्लक्ष; 25 नवे अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी - अ‍ॅड. वैभव थोरात

घटती विद्यार्थी संख्या, प्राध्यापक भरती, विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेत न मिळणे, विस्तारीकरण, नवीन अभ्यासक्रमांचा अभाव अशा अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्यांबाबत अधिसभेमध्ये सहा वेळा स्थगन प्रस्ताव सादर करुननही मुंबई विद्यापीठाकडून आयडॉलमधील सुविधा अद्ययावत करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यातच आयडॉलमध्ये 25 नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सिनेट सदस्यांकडून सूचना करूनही विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आयडॉल ( IDOL ) हे गर्तेत सापडत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ

By

Published : Apr 26, 2022, 9:01 PM IST

मुंबई -घटती विद्यार्थी संख्या, प्राध्यापक भरती, विद्यार्थ्यांना पुस्तके वेळेत न मिळणे, विस्तारीकरण, नवीन अभ्यासक्रमांचा अभाव अशा अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्यांबाबत अधिसभेमध्ये सहा वेळा स्थगन प्रस्ताव सादर करुननही मुंबई विद्यापीठाकडून ( Mumbai University ) आयडॉलमधील ( Institute of Distance and Open Learning ) सुविधा अद्ययावत करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यातच आयडॉलमध्ये 25 नवीन अभ्यासक्रम ( 25 New Courses ) सुरू करण्याबाबत सिनेट सदस्यांकडून सूचना करूनही विद्यापीठाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आयडॉल हे गर्तेत सापडत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांची संख्या घटली -मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमधून नोकरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा शिक्षण घेण्याकडे नेहमीच कल दिसून येतो. मात्र, आयडॉलमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत न मिळणे, परीक्षा केंद्राची अपुरी सुविधा, बदलत्या व्यवस्थेनुसार नवीन अभ्यासक्रमांची वाणवा यामुळे गेल्या काही वर्षापासून आयडॉलमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. चार वर्षांमध्ये आयडॉलची विद्यार्थी संख्या 80 हजारांहून थेट 60 हजारांवर आली आहे. विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि आयडॉलमधील विविध समस्यांबाबत अधिसभेमध्ये सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांच्याकडून तब्बल सहा वेळा स्थगन प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, आयडॉलमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासनाखेरीज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर हे आयडॉलबाबत काहीच ठोस पावले उचलत नाहीत.

25 नवे अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी -अन्य विद्यापीठांमधील दूरस्थ विभागात विद्यार्थी संख्या वाढत असल्याने आयडॉलमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी एमएसडब्ल्यू, जीएसटी, सायकॉलोजी, हॉर्टिकल्चर, जर्नालिझम, लेबर लॉ, सायबर क्राईम, कृषी व्यवस्थापन, बागकाम, म्युच्युअल फंड, इन्शुअरन्स, डेटा सायन्स, टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन शेअर मार्केट, अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषा शिक्षण प्रमाणपत्र असे जवळपास 25 नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना वारंवार आयडॉल व विद्यापीठाकडे केल्या आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वैभव थोरात यांनी सांगितले.

युवासेनेकडून टीका -संचालकांना आयडॉलशी देणेघेणे नाही. संचालकांविना चालणार्‍या आयडॉलवर दोन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाने संचालकांची नियुक्ती केली. पण, कामकाजात सुसूत्रता येण्याऐवजी गोंधळातच वाढ झाली. आयडॉलमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करणे, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, आयडॉलचे विस्तारीकरण अशा कोणत्याच बाबीत संचालकांकडून स्वारस्य दाखवण्यात येत नाही. आयडॉलसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीही संचालक अधिसभेमध्ये उपस्थित राहत नसून, त्यांना आयडॉलच्या विकासाशी काहीही देणेघेणे नसल्याची टीका युवासेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केली.

हेही वाचा -History of Mumbai CSMT : मुंबई मेरी जान; सीएसएमटी जगात भारी...

ABOUT THE AUTHOR

...view details