मुंबई -मार्च महिन्याचे वेतन तब्बल २८ दिवस उशिरा दिले असतांनाच एप्रिल महिन्याच्या पगारालाही सरकारकडून उशीर होत आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांना वेळेवर वेतन देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीने शासनाकडे केली आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना पत्र दिले असून त्यात ही मागणी केली आहे.
शिक्षकांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाला सरकारकडून विलंब
मागील महिन्यात तांत्रिक अडचणींचे कारण देत शिक्षकांच्या वेतनाला तब्बल १ महिना उशीर केला तर आता निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. वेळेवर पगार न झाल्याने राज्यातील शिक्षकांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
शिक्षकांच्या वेतनासाठी अद्यापही निधी उपलब्ध न केल्याने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या पत्रात केली आहे. मागील महिन्यात तांत्रिक अडचणींचे कारण देत शिक्षकांच्या वेतनाला तब्बल १ महिना उशीर केला तर आता निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. वेळेवर पगार न झाल्याने राज्यातील शिक्षकांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना वरील औषधोपचार, बँकांचे थकलेले हफ्ते, त्यावर आकारलेला दंड यामुळे शिक्षक आधीच त्रस्त आहे. त्यात प्रत्येक महिन्याला जर असाच उशीर झाला तर शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर बँकांची दंड आकारणी होईल. त्यामुळे सरकारने एप्रिल ते पुढील वर्षाच्या मार्च महिन्यांपर्यंत शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून वेतनाला दर महिन्याला उशीर न होता शिक्षकांचे वेतन वेळेवर होतील असे, अनिल बोरनारे यांनी सांगितले.