मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Ayodhya Visit ) यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ५ जूनला अयोध्येला जाणार आहे. राज यांच्या दौऱ्याला अयोध्येत तीव्र विरोध सुरु आहे. शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद ( Deepali Syed Criticized Raj Thackeray ) यांनी राज ठाकरेंवर पत्रकार परिषदेत निशाणा साधला. ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे आहे. ते शिवसेनेला नोटाचे राजकारण काय शिकवणार? तुम्हाला अयोध्येत जायची भीती वाटत असेल तर शिवसेनेसोबत जा, सेनेचा धाक तिथे आजही कायम आहे, अशी टीका सय्यद यांनी केली. आता मनसे याला काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात मशिंदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. राज यांच्यावर शिवसेनेसह विरोधकांनी टीकेची झोड उठवली. हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राज यांना भाजप खासदाराने अयोध्येत येण्यास मनाई केली आहे. राजकीय चर्चांना यावरुन उधाण आले असताना, शिवसेनेच्या प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना छेडले आहे.