मुंबई -विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा होत असते. मुख्य अर्थसंकल्प यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यात अनेक तरतुदी झालेले आहेत. त्यामुळे पुरवणी मागण्या तरी फारशी अडचण येणार नाही. जनतेच्या प्रश्नांना पावसाळी अधिवेशन पुढे ढकलल्यामुळे काही अडचणी येणार नाही, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.
आजचा दिवस चांगला शुभेच्छा देण्याचा -आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस शुभेच्छा देण्याचा आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देत आहोत. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतोय. मात्र, त्यांनी मुलाखतीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांना आज उत्तरे देणार नाही, त्याबाबत नक्कीच लवकरच बोलू असेही केसरकर यांनी सांगितले.
सरकारच्या कामाचा वेग अधिक -महाविकास आघाडी सरकारच्या कामाच्या वेगापेक्षा शिंदे सरकारच्या कामाचा वेळ अधिक आहे. जर महाविकास आघाडी सरकार 50 निर्णय घेत असेल तर शिंदे सरकार सव्वाशे निर्णय घेत आहे. त्यामुळे कामाचा वेग जोरदार आहे जरी दोन मंत्री असले तरी त्याने फारसा कामावर परिणाम होत नाही. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती बाबतही योग्य निर्णय घेतले जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.