मुंबई -शिवसेना पक्षावर कुणीही दावा ( Deepak Kesarkar on government formation ) केलेला नाही, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा चुकीची आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार आहोत, असेही केसरकर ( Kesarkar on shivsena party ) यांनी दिली.
Deepak Kesarkar on Shivsena : शिवसेना पक्षावर कुणीही दावा केलेला नाही, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार - दीपक केसरकर - शिवसेना पक्ष दावा दीपक केसरकर प्रतिक्रिया
शिवसेना पक्षावर कुणीही दावा ( Deepak Kesarkar on government formation ) केलेला नाही, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली आहे. पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा चुकीची आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार आहोत, असेही केसरकर ( Kesarkar on shivsena party ) यांनी दिली.
तुम्ही महाविकास आघाडीसोबतची साथ सोडा आपण भाजप सोबत जाऊ, अशी वेळोवेळी विनंती आपण उद्धव ठाकरे यांना केली होती. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली नाही म्हणून आपल्याला शिवसेनेची साथ सोडून बंडखोरी करावी लागली, असे शिवसेना गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना संपवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने केले. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आले, मात्र वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने शिवसेनेला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. राज्यसभा व विधान परिषदा निवडणुकीत या सहयोगी पक्षांमुळे आमच्या उमेदवारांना पराभवाचा फटका बसला, असा आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केंद्र राज्यात आग लावली -शिवसेना नेते संजय राऊत सकाळी उठून पत्रकार परिषद घ्यायचे व केंद्र विरोधी वक्तव्य करायचे, त्यामुळे राज्य व केंद्रात तेढ निर्माण होऊन दुरावा निर्माण झाला. सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमुळे शिवसेनेचे अतोनात नुकसान झाले. नेहमीच या सहयोगी पक्षाने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट आपण व शिवसेना आमदारांनी वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली, मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून आम्हाला बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडावे लागले. शिवसेना व उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी कोणताही वाद नसून पक्षाच्या हितासाठी आपण बाहेर पडल्याचेही केसरकर म्हणाले.
हेही वाचा -Crime in Kandiwali : धक्कादायक! प्रेम प्रकरणातून त्याने ३ महिलांना संपवलं; मुंबईतील थरारक घटना