महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील रात्रीच्या संचारबंदी संदर्भात लवकरच निर्णय होईल - मंत्री अस्लम शेख - night curfew in Mumbai

कोरोनासंदर्भातले कठोर निर्बंध आपल्याला पाळावे लागतील, परंतु आता जे निर्बंध लावलेले आहेत तेच मुंबईकर पळताना व्यवस्थितपणे दिसून येत नाहीत. त्यामुळे कुठेतरी आम्हाला रात्रीच्या संचारबंदीविषयी विचार करावा लागत आहे. गरज पडल्यास रात्रीच्या संचारबंदीची घोषणा देखील आम्ही लवकरात लवकर करू, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

Minister Aslam Shaikh
मंत्री अस्लम शेख

By

Published : Mar 18, 2021, 4:43 PM IST

Updated : Mar 18, 2021, 5:15 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईतील स्थिती अत्यंत बिकट नाही मात्र अजूनही कठोर निर्बंध लावू शकतो आणि येत्या काही दिवसात रात्रीची संचारबंदी लावावी की नाही यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. आज कोस्टल रोड पाहणी दौरा करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माहिती देताना मंत्री अस्लम शेख

मुंबईतील कोरोनाची स्थिती बिकट नाही

मुंबईसह राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कालची आकडेवारी पाहिली तर दिवसाला जवळपास दोन हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत, तरी स्थिती बिकट आहे असं म्हणता येणार नाही, पण कठोर निर्बंध आणण्याची आवश्यकता आहे. तसेच गरज भासल्यास रात्रीच्या संचारबंदी संदर्भात आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे अस्लम शेख यांनी सांगितले आहे.

मुंबईतील रात्रीच्या संचारबंदीसंदर्भात लवकर निर्णय -

मुंबईची स्थिती बिकट नाही. मात्र, अजून कठोर निर्बंध लावून आपण लॉकडाऊन लावण्यापासून दूर देखील राहू शकतो. त्यामुळे कठोर निर्बंध आपल्याला पाळावे लागतील, परंतु आता जे निर्बंध लावलेले आहेत तेच मुंबईकर पळताना व्यवस्थितपणे दिसून येत नाहीत. त्यामुळे कुठेतरी आम्हाला रात्रीच्या संचारबंदीविषयी विचार करावा लागत आहे. गरज पडल्यास रात्रीच्या संचारबंदीची घोषणा देखील आम्ही लवकरात लवकर करू, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

तसेच दादरमधील भाजी मार्केट, फूल मार्केट हे दुसरीकडे हलवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. कारण दादर या परिसरामध्ये या भाजी मार्केटमुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचा फटका कोरोना प्रसारासाठी होत आहे. त्यामुळे शासन म्हणून आम्ही योग्य तो निर्णय लवकरच जाहीर करू, असं अस्लम शेख यांनी सांगितले आहे.

Last Updated : Mar 18, 2021, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details