मुंबई -राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी, त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली.
हेही वाचा -मावळच्या घटनेला सरकार नाही तर भाजपाच जबाबदार होते - शरद पवार
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य