महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis meets CM Eknath Shinde : 'वर्षा'वर शिंदे- फडणवीसांमध्ये जवळपास तासभर रात्री खलबते ; अंधेरी पूर्वच्या पोट निवडणूकीवर चर्चा - Andheri East by election

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' (Varsha Residence) या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा भेट (Devendra Fadnavis meets CM Eknath Shinde) घेतली.

Meeting at Varsha Residence
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Oct 16, 2022, 9:51 AM IST

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' (Varsha Residence) या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा भेट (Devendra Fadnavis meets CM Eknath Shinde) घेतली. जवळपास तासभर झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा - सध्या राज्यभराचे लक्ष असलेली अंधेरी पूर्वची पोट निवडणूक महत्त्वाची असून या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी होणारी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक (Andheri East by election) ही अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या पक्षाला महानगरपालिका निवडणुकीत जनाधार मिळेल, असे कयास लावले जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या पक्षासाठी जेवढी महत्त्वाची आहे. तेवढीच भारतीय जनता पक्षासाठी देखील महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असून, या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीत चर्चा झाली (CM Eknath Shinde at Varsha residence) आहे.


राज्यात परतीच्या पावसाचा फटका -राज्यभरात अनेक ठिकाणी सध्या परतीच्या पावसाचा फटका बसत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्याच्या अनेक भागातून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याबाबतचाही आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या बैठकीत घेतला असल्याची माहिती (Devendra Fadnavis meets CM Eknath Shinde) आहे.



पोलीस बदल्यांबाबत बैठकीत चर्चा -पोलीस दलातील काही बदलांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या काळात पोलीस बदल्यांच्या मागे मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सातत्याने भाजपाने आरोप केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details