महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dahi Handi Celebration 2022 दहीहंडी दरम्यान ७८ गोविंदा जखमी, अनेकांवर उपचार सुरू - मुंबईत दहीहंडी सण धुमधडाक्यात साजरा

मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७८ गोविंदा जखमी Govinda Injured in Mumbai During Dahi Handi celebration झाले आहेत. यातील ६७ गोविंदांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११ गोविंदांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुंबईत दहीहंडी उत्साहात साजरी केली जात आहे. Mumbai Dahi Handi Celebration 2022

dahi handi
दहीहंडी

By

Published : Aug 19, 2022, 7:39 PM IST

मुंबईमुंबईत दोन वर्षे कोरोना विषाणू प्रसारामुळे दहीहंडीसह इतर सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा विषाणूचा प्रसार कमी झाल्याने मुंबईत दहीहंडी सण धुमधडाक्यात साजरा Dahi Handi 2022 Mumbai केला जात आहे. हा सण साजरा करण्यासाठी थर लावताना सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७८ गोविंदा जखमी Govinda Injured in Mumbai During Dahi Handi celebration झाले. त्यापैकी ६७ गोविंदा वर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर ११ गोविंदा अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. Mumbai Dahi Handi Celebration 2022

७८ गोविंदा जखमीमुंबईत १५०० हून अधिक मंडळे आहेत. ही मंडळे मुंबईत सर्वत्र फिरून राजकीय पक्ष, नेते, संस्था यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीला भेट देवून उंच थर लावून सलामी देणे, दहीहंडी फोडत असतात. या बदल्यात या मंडळांना आयोजन कर्त्यांकडून रोख बक्षिसे दिली जातात. जास्तीत जास्त बक्षिसे मिळवण्याचा प्रयत्न मंडळांचा असतो. याच दरम्यान दहीहंडीसाठी थर लावताना मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७८ गोविंदा जखमी झाले होते. त्यांना सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ७८ पैकी ६७ गोविंदावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ११ गोविंदावर उपचार सुरु आहेत. यंदा आतापर्यंत दहिहंडी दरम्यान कोणतीही दुर्घटना नोंद झालेली नाही.


माजी महापौरांची धावदरम्यान थर लावताना जखमी झालेल्या गोविंदांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. गोविदांवर त्वरित उपचार व्हावेत, उपचार करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली. जखमी गोविदांची विचारपूस करून डॉक्टरांनाही सूचना केल्या. जखमी गोविदांसोबत असलेल्याना मार्गदर्शनही माजी महापौरांनी केले.


या रुग्णालयात गोविंदा दाखल

जेजे हॉस्पिटलमध्ये २,
सेंट जॉर्ज हॉस्पिटल ३,
जीटी हॉस्पिटल - ११,
नायर मध्ये ९,
केई एम १७,
सायन ७,
ट्रॉमा रुग्णालय २,
कूपर हॉस्पिटल ६,
आंबेडकर हॉस्पिटल कांदिवली १,
व्ही एन देसाई ६,
राजावाडी हॉस्पिटल १०,
पोद्दार हॉस्पिटल ४.

हेही वाचाDahi Handi Festival Dindoshi मानवी मनोऱ्याच्या तिसऱ्या थरावर अफजल खान वधाचा देखावा

ABOUT THE AUTHOR

...view details