महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cyrus Mistry Citizenship भारतासोबत या देशाचेही नागरीक होते सायरस मिस्त्री, वडील भारतीय तर आई आयरिश - दोन देशांचे नागरिक सायरस मिस्त्री

उद्योजक (Industrialist) आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष (Former Chairman of Tata Group) सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन (Cyrus Mistry Death) झालं आहे. त्यानंतर त्यांच्या नागरिकत्वाच्या (Cyrus Mistry Citizenship) चर्चा सुरू झाल्या आहेत. भारतासोबत आयर्लंड (Ireland) देशाचेही नागरीक होते सायरस मिस्त्री. वडील भारतीय तर आई आयरिश (Mother Is Irish) आहे. जाणून घ्या सविस्तर

Cyrus Mistry
सायरस मिस्त्री

By

Published : Sep 4, 2022, 10:16 PM IST

मुंबईउद्योजक (Industrialist) आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष (Former Chairman of Tata Group) सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन (Cyrus Mistry Death) झालं आहे. त्यानंतर त्यांच्या नागरिकत्वाच्या (Cyrus Mistry Citizenship) चर्चा सुरू झाल्या आहेत. भारतासोबत आयर्लंड (Ireland) देशाचेही नागरीक होते सायरस मिस्त्री. वडील भारतीय तर आई आयरिश (Mother Is Irish) आहे. जाणून घ्या सविस्तर

दोन देशांचे नागरिक सायरस मिस्त्रीसायरस मिस्त्री यांचे आई वडील पारसी (Parsi parents) धर्माचे असून त्यांची मुळे भारतात होती. सायरस यांच्या आईचा जन्म आयर्लंडमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांनी आयरिश नागरिकत्व घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सायरस देखील भारतासोबतच आयर्लंडचे नागरिक आहेत. इतकाच नाही तर सायरस मिस्त्री यांना शापूर मिस्त्री नावाचा मोठा भाऊ आहे, तो देखील आयरिश नागरिक आहे.

कौटूंबिक पार्श्वभुमीसायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचे सुपुत्र होते. मिस्त्री हे मुंबईतील पारशी समाजाचे (Parsi community)सदस्य होते. पारसी अगदी सुरुवातीच्या वसाहत काळापासून व्यापारी आणि उद्योगपती म्हणून समृद्ध झाले होते. याचं समाजातील कुमार मंगलम बिर्ला, टाटा, धीरूभाई अंबानी अशी सगळी ज्येष्ठ वयाची उद्योगपती मंडळी आहे. तुलनेने सायरस मिस्त्री हे त्यांच्यापेक्षा कमी वयाचे आणि भारत आणि भारताबाहेर बांधकाम उद्योग विस्तारणारे यशस्वी उद्योजक (entrepreneur expanding construction industry) म्हणून ओळखले जायचे.

उद्योगविश्वातील योगदान1991 मध्ये सायरस यांनी कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला. शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेड या प्रमुख बांधकाम कंपनीचे संचालक झाले. त्यांचा भाऊ शापूर यांनी समूहाच्या रिअल इस्टेट व्यवसायात वाढ केली. वडील संचालक मंडळाचे अध्यक्ष राहिले. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे (Tata Group) सदस्य बनले. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा (Chairmanship of the Tata Group) सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता. पारंपारिक बांधकामाच्या पलीकडे मोठ्या अभियांत्रिकी प्रकल्पांपर्यत सायरस यांनी मजल मारली. परदेशातही व्यवसाय विस्तारला.


ABOUT THE AUTHOR

...view details