महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 6, 2022, 7:49 PM IST

ETV Bharat / city

Cyrus Mistry car accident सायरस मिस्त्री कार अपघाताचे गूढ मर्सिडीज उलगडणार, जर्मनीत चिपचा डेटा करणार डिक्रिप्ट

मिस्त्री यांच्या कार अपघाताचे गूढ आता मर्सिडीच बेंझ कंपनी उलगडणार आहे (Cyrus Mistry car accident). त्यासाठी कंपनीने या कारमधील महत्वाची डाटा चिप मिळवली आहे (decrypted data of chip). विमानामध्ये ज्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स असतो. त्याप्रमाणेच या चिपचे कार्य चालते अशी माहिती मिळत आहे. मर्सिडीज-बेंझच्या एका टीमने, ज्याची कार रोड डिव्हायडरवर आदळून उद्योगपती सायरस मिस्त्री आणि अन्य एक प्रवासी ठार झाले, त्यांनी वाहनाचा डेटा गोळा केला आहे (Mercedes will reveal the mystery).

Cyrus Mistry car accident
Cyrus Mistry car accident

मुंबई - सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताचे गूढ आता मर्सिडीच बेंझ कंपनी उलगडणार आहे. त्यासाठी कंपनीने या कारमधील महत्वाची डाटा चिप मिळवली आहे (decrypted data of chip). विमानामध्ये ज्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स असतो. त्याप्रमाणेच या चिपचे कार्य चालते अशी माहिती मिळत आहे. मर्सिडीज-बेंझच्या एका टीमने, ज्याची कार रोड डिव्हायडरवर आदळून उद्योगपती सायरस मिस्त्री आणि अन्य एक प्रवासी ठार झाले, त्यांनी वाहनाचा डेटा गोळा केला आहे (Cyrus Mistry car accident). हा डाटा असलेली चिप पुढील विश्लेषणासाठी डिक्रिप्ट केला जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कारच्या टायरचा दाब आणि ब्रेक फ्लुइडची पातळी यासारख्या इतर तपशीलांचीही चौकशी केली जाईल, असे कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.

मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन अपघातग्रस्त कारमधील एनक्रिप्टेड डेटा गोळा केला. डेटाचे विश्लेषण केले जाईल, डिक्रिप्ट केले जाईल आणि पुढील तपासासाठी पोलिसांना त्याची माहिती दिली जाणार आहे, असे मोहिते म्हणाले. कमी ब्रेक फ्लुइडमुळे ब्रेक लाइनमध्ये हवा जाते. त्यामुळे ब्रेक सॉफ्ट होतात. यामुळे स्पॉंजी ब्रेक पेडल धोकादायक ठरू शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सायरस मिस्त्री (54) आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे रविवारी दुपारी पालघर जिल्ह्यात रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमधील अन्य दोन प्रवासी, अनाहिता पांडोळे (55), ज्या कार चालवत होत्या. तसेच त्यांचेपती डॅरियस पांडोले (60) जखमी झालेत. त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे चौघेजण गुजरातहून मुंबईला जात असताना सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. प्राथमिक तपासानुसार मृतांनी सीट बेल्ट घातला नव्हता. अतिवेग आणि चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असे सांगतात. प्रथमदर्शनी, अपघात झाला तेव्हा आलिशान कारचा वेग प्रचंड होता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details